प्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 14:18

अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.

मोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 14:05

निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.

अमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 07:23

आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.

प्रियंका गांधींना नेमका कुणाचा विरोध?

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:28

भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.

वरूण गांधींचा मार्ग चुकलाय - प्रियंका गांधी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 18:48

प्रियंका वढेरा- गांधी अखेर वरूण गांधी यांच्याविषयी बोलल्या आहेत. आपला भाऊ वरूण गांधी याने राजकारणात चुकीचा मार्ग निवडला आहे, जनताच वरूणला योग्य रस्त्यावर आणेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.

वरुण गांधींवरून वाद, प्रियंकाच्या टीकेवर मनेकाचा पलटवार

Last Updated: Sunday, April 13, 2014, 11:52

काँग्रेसची स्टार प्रचारक आणि काँग्रेस अध्यक्षा सोनियांची कन्या प्रियंका गांधी-वढेरानं सुल्तनापूरच्या जनतेला वरूण गांधींना पराभूत करण्याचं आवाहन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. प्रियंकाच्या या आवाहनावर वरुणची आई मनेका गांधी यांनी प्रियंकावर पलटवार केलाय. मनेकानं म्हणटलं की देशाची सेवा करणं म्हणजे रस्ता भटकणं नाही. निवडणुकीनंतर तर हे जनताच दाखवून देईल.

देशात मोदींची लाट नाहीच - प्रियंका गांधी

Last Updated: Thursday, April 10, 2014, 14:08

भाजप आणि आपच्या विजयाच्या दाव्यानंतर सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी यांनी देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचं म्हटलं आहे.

प्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी

Last Updated: Thursday, March 6, 2014, 11:50

प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा आहे, पण त्यांना प्रकाशझोतात यायचे नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी काल मुंबईत काही पत्रकारांशी बोलत होते.

मोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!

Last Updated: Monday, October 14, 2013, 15:21

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेस प्रियांका अस्त्राची वापर करणार असल्याची माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली होती. काँग्रेसनं मात्र या वृत्ताचं तत्काळ खंडन केलंय.

प्रियंका गांधी जनतेच्या दरबारात

Last Updated: Saturday, August 4, 2012, 21:02

प्रियांका गांधींवर आता नवी जबाबदारी येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत रायबरेली मतदार संघाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर राहील. याखेरीज नवी दिल्लीत प्रियांका जनता दरबार घेतील असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं.

प्रियंकाने घेतला सोनिया गांधींचा गालगुच्चा

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 11:49

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी या मायलेकीचं प्रेम पाहून रायबरेलीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. या आधीही रायबरेलीतीलच प्रचारसभेत प्रियांकाने मंचावर आपल्या मुलांना धक्का दिला होता.

प्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर

Last Updated: Saturday, January 14, 2012, 23:08

उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी- वढेरा १६ जानेवारीपासून तीन दिवस आमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.