सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

Last Updated: Friday, April 18, 2014, 15:54

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत.

आता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले

Last Updated: Thursday, January 23, 2014, 15:34

सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे. आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्‍चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 10:48

चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

मंगळयानालाही टोचणार इंजेक्शन!

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 10:26

मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!

मंगळयानात आलेला अथडळा दूर!

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 20:58

भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाची कक्षा वाढविण्याच्या चौथ्या टप्प्यात यानाची कक्षा एक लाखांहून अधिक किलोमीटरपर्यंत वाढविण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) यश आल्यानं ही मोहिम पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

भारताच्या ‘मंगळ मिशन’चं काउंटडाऊन सुरू

Last Updated: Sunday, November 3, 2013, 15:51

भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.

नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन

Last Updated: Saturday, November 2, 2013, 22:45

पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने त्यांनी मृतांच्या वारसास पाच लाखांचा चेकही दिला.

'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'

Last Updated: Saturday, September 14, 2013, 15:08

दिल्ली गँगरेप प्रकरणाशी मिळती जुळती घटना नुकतीच एका फोटो पत्रकाराच्या बाबतीत मुंबईत घडली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खुद्द पोलीसच कोर्टात करणार आहेत.

आता मिशन झिम्बाब्वे...टीम रवाना

Last Updated: Sunday, July 21, 2013, 17:51

चँम्पियन्स टीम आता झिम्बाब्वेशी झुंज देण्यास तयार झालीय. यासाठी टीम रविवारी झिम्बाब्वेला रवाना झालीय. परंतु यात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी असणार नाही, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेशी मॅच खेळणार आहे

पाणी वाचवूया... मिशन २४ तास

Last Updated: Friday, July 5, 2013, 16:43

कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणीटंचाई..... आपण बदलू शकतो हे चित्र....

स्पॉट फिक्सिंग : राजीव शुक्ला यांचा राजीनामा

Last Updated: Saturday, June 1, 2013, 19:59

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय.

अकरावी ऑनलाइन प्रवेश, जागांत वाढ

Last Updated: Monday, May 6, 2013, 08:54

दहावी पास विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी जागांची वाढ कऱण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा तब्बल ७ हजार ६५ जागांची वाढ झाल्याने अकरावीचा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.

डमी विद्यार्थी पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Last Updated: Thursday, May 2, 2013, 23:31

मुंबईतील बड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी डमी विद्यार्थी बनून बसणा-या एका मोठ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय. यासाठी ही टोळी एका परिक्षे़चे एक लाख रुपये घ्यायची.

हैदराबाद बॉम्बस्फोट : मिशन ‘देशमुख’

Last Updated: Sunday, March 3, 2013, 14:35

हैदराबादला बॉम्बस्फोट घडवून आणताना इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं सुनियोजित योजना आखली होती. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या तेराव्याला (मृत्यूनंतर १३व्या दिवशी) हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या योजनेचं नाव होतं... `मिशन देशमुख`.

...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:11

क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्याला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. कसाबला ७.३० वाजता फाशी देण्यात आल्यानंतर ७.४५ वाजता गृहमंत्र्यालया फोन आला, ‘मिशन एक्स’ कंप्लीट.

दिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 14:36

झी २४ तास घेऊन आलंय मिशन दिवाळी. आपण ठरविल्यास फटाक्यांचा वापर बंद करून ध्वनी आणि वायू प्रदुषणावर आळा आणू शकतो. तसेच फटाक्यांमध्ये व्यर्थ जाणाऱ्या पैश्यांचा सदुपयोग करून, लाखो गरजुंची दिवाळी आनंददायी बनवू शकतो. या मिशनला तुमच्या सहयोगाची गरज आहे.

सेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार

Last Updated: Saturday, November 3, 2012, 12:44

काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

`अँग्री बर्ड्स`चं आता मंगळावर आक्रमण...

Last Updated: Saturday, August 25, 2012, 16:40

पक्षांचा थवा आणि डुक्करांचा कळप आता नासाच्या मंगळावारीचा वेध घेणार आहेत. हे सगळं घडणार आहे अँग्री बर्ड्स स्पेस या अँग्री बर्ड्सच्या नव्या व्हर्जनमध्ये...

अरूप पटनायक यांची उचलबांगडी

Last Updated: Friday, August 24, 2012, 08:13

मुंबई हिंसाचारप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुकत यांची अरूप पटनायक यांची उचलबांगडी राज्य सरकराने केली आहे. त्यांना बढती देताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या महासंचालक पदाचा चार्ज देण्यात आला आहे. झी २४ तासने अरूप पटनायक यांच्या बदलीचे सर्वप्रथम वृत्त दिले होते.

कमिशनर अरूप पटनायक यांची बदली होणार?

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 23:32

मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांकडं पाठवला आहे. तीन दिवसांपासून तो मुख्यमंत्र्याकंड पडून आहे.

Exclusive - मिशन 'मंगळ'स्वारी !!!

Last Updated: Monday, August 6, 2012, 13:08

नासाची 'मंगळ'स्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.

'अग्निपरीक्षा' - मिशन मंगळ

Last Updated: Friday, August 3, 2012, 23:02

येत्या ६ ऑगस्टला त्यांचं मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटच्या सात मिनिटांत एका क्षणाची जरी चूक झाली तरी १३ हजार ७०० कोटींचा चुरडा व्हायला वेळ लागणार नाही...असं काय आहे त्या सात मिनिटांत...आणि भारताचं मिशन मंगळ काय आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'अग्निपरीक्षा' मध्ये करण्यात आला आहे.

आज अकरावीची दुसरी यादी होणार जाहीर

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:48

आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्‍या अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्जांना ऍडमिशनची अपेक्षा.

जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 10:40

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.

सावधान... हजारो शाळा होणार आहेत बंद!

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 17:00

राज्यातल्या दोन हजार सहाशे शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळांमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती आढळलीय. त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

अमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 22:55

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

'कॅट’मध्ये मराठी पाऊल पुढे

Last Updated: Thursday, January 12, 2012, 11:43

असोसिएशन ऑफ ऑल इंडिया मॅनेजमेंट (एआयएमएस) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेत मराठी झेंडा फडकावून मुंबईचा ठसा दिसून आला आहे.

कोण बुवा हा टॉम क्रुझ ?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:58

एका वेब साईटने दिलेल्या वृत्तानुसार २०० लोकांना विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्याचे प्रत्येकी १५० रुपये मानधन देण्यात आलं.टॉम क्रुझचे आगमन झाल्यानंतर विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्यासाठी ज्युनिअर आर्टिस्टची व्यवस्था करण्याची जबाबदारी एका मॉडेल कोऑरडिनेटर सोपवण्यात आली होती. आता मजेची गोष्ट म्हणजे यापैकी अनेकांना टॉम क्रुझ कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती.

अभियांत्रिकीच्या ‘दुकाना’त ग्राहकच नाही

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:05

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.

मोदींच्या शालीने ओढवला वाद

Last Updated: Thursday, October 20, 2011, 13:16

आज वडोदरा येथील नवसारीला चालू असणाऱ्यासद्भावना उपवासाच्या दरम्यान मुस्लिम समाजाने दिलेली शाल अंगावर घेण्यास नकार दिला. या सद्भावना उपवासाच्या वेळी एका मुस्लिम व्यक्तीने मोदींना भेट म्हणून शाल देऊ केली. पण, शाल स्वीकारण्यास नकार दिला.