मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:42

मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.

मेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 20:46

मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११ किमी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाले.

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?

Last Updated: Saturday, August 31, 2013, 16:11

मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.

स्मारकांचं संरक्षण की मेट्रो प्रकल्प?

Last Updated: Sunday, August 4, 2013, 20:27

संरक्षित स्मारकाच्या १०० मीटर परिसरात कोणतही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पुण्यातल्या स गो बर्वे चौकातल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.

दिल्ली मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 17:40

दिल्लीत दिवसागणिक वाईट गोष्टींच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर उजेडात आले आहे. दिल्ली मेट्रोचा दुसरा MMS लिक करण्यात आला आहे. हा MMS पोर्न साईटवर लोढ करण्यात आलाय.

मेट्रो रेल्वे २ तास अडकली बोगद्यात!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:35

मुंबईमध्ये दिल्लीसारखी मेट्रो रेल्वे कधी सुरू होणार याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मंगळवारी नवी दिल्लीच्या मेट्रो रेल्वेमध्ये एक अनपेक्षित घटना घडली.

पुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला

Last Updated: Thursday, May 2, 2013, 20:11

गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...

मेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच

Last Updated: Thursday, May 2, 2013, 10:45

महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.

मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

Last Updated: Thursday, January 24, 2013, 11:15

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मेट्रो स्टेशनच्या जागेबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ज्या ठिकाणाहून मेट्रो सुटणार आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन करायचे की शिवसृष्टी यावरुन या दोन्ही पक्षात जुंपलीय.

पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री

Last Updated: Monday, January 7, 2013, 19:08

पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री झालीय. या विषयावर सर्व पक्षांच्या गट नेत्यांची पवारांनी बैठक घेतली. मेट्रोच्या विषयात आता पवारांनी लक्ष घातल्याने, वर्षानुवर्षे रखडलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत...

पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार मेट्रो

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 08:20

पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील

मेट्रो रेल्वे अपघाताची होणार चौकशी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 16:29

मुंबई मेट्रो रेल्वे अपघाताची चौकशी होणार आहे. या पुलाच्या मजबुतीविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची चौकशी होणार आहे.

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 22:16

मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात जवळपास २० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.

‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 14:26

मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

पुण्याच्या मेट्रो रेल्वेचे वाजले की बारा...

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 15:47

पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्च 2012 पर्यंत लांबणीवर पडला. महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्यानं मेट्रोच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळं आता निवडणुकांनंतर मार्चमध्ये नव्या सभागृहातच मट्रोचा विषय चर्चेला येणार आहे.