बलात्कार करुन जिवंत जाळले, College girl dies after being gang-raped

बलात्कार करुन जिवंत जाळले

बलात्कार करुन जिवंत जाळले
www.24taas.com, झी मीडिया,इटावा

उत्तरप्रदेशातील इटावामधील केसरमऊ गावात बुधवारी एका महाविद्यालयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या क्रुर घटनेनंतर शुक्रवारी सकाळी रुग्णालयातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शरमेची बाब म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेतील दोषी म्हणून पोलिसांनी सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. जळालेल्या अवस्थेतच त्या मुलीला लोकांनी सैफईमधील पीजीआय रुग्णालयात भरती केले होते. मात्र, तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला. इटवाचे उच्च पोलीस निरीक्षक ऋषिपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी काही जणांनी मिळून सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळले.

मृतक मुलीचा भाऊ इकदिल याने फरहान नावाच्या एका तरुणाविरोधात मुख्य आरोपी म्हणून तर, इतर पाच जणांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पण, अद्यापही त्यापैकी कोणालाही अटक झालेली नसल्याचे सुत्रांकडून कळते.


# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 12, 2013, 16:14


comments powered by Disqus