चिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग

Last Updated: Friday, May 9, 2014, 14:13

चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

...जेव्हा दारुच्या ठेक्यावर मगरीनं दिली धडक!

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 16:34

मेरठच्या देवल गावात दारुच्या ठेक्यावर मंगळवारी सकाळीच एक अनपेक्षित पाहुणा येऊन धडकला... आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच धाबे दणाणले... कारण, हा पाहुणा होता एक भली मोठी मगर...

अमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, March 30, 2014, 16:04

अमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत कोतवाल कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.

चेन्नईत बंगळूर स्टाइल ATM हल्ला, महिलेची लूट

Last Updated: Monday, November 25, 2013, 09:06

बंगळूरमध्ये एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला होण्याची घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चेन्नईमध्येही अशीची घटना घडली आहे. रेशनच्या दुकानात काम करणार्‍या एका महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन आणि १५ हजार रुपये दोन चोरट्यांनी पळविले.

नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’

Last Updated: Friday, October 4, 2013, 11:40

सध्या देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला असणाऱ्या टी स्टॉलवर मोदींची छाप दिसणार आहे. ‘नमो टी स्टॉल` उभारण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

मुंबईत २४ तास सुरू राहाणार हॉटेल्स?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:21

न्यूयॉर्कच्या धर्तीवर आता मुंबईतही रात्रभर दुकानं आणि हॉटेल्स खुली राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कायदा समितीनं त्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवलाय. त्यावर आता विचार सुरू आहे.

बार-दारूची दुकाने बंद होणार

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 15:56

महामार्गाजवळील (हायवे लगत) असलेले बार आणि दारूची दुकानं बंद होणार आहेत. उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.

व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:47

दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.

बीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे

Last Updated: Monday, June 4, 2012, 17:34

बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, May 11, 2012, 22:57

पुण्यात हडपसरमधील ओंकार ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार करून दरोडा घालण्याचा 2 जणांनी प्रयत्न केला. मात्र दुकानाचे मालक आणि परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळं हा दरोड्याचा प्रयत्न फसला. सुदैवानं गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही.

उपकर चुकवल्याबद्दल वाईन शॉप सील

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 14:15

उपकर चुकवल्याप्रकरणी नवीमुंबई महापालिकेने मद्य दुकानावर सील ठोकण्याची कारवाई केली आहे. वाशी मधल्या सोनी वाईन्स या दुकानानं महापालिकेचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा उपकर थकवला होता.

सराफाच्या दुकानात वॉचमननेच केली चोरी

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 13:31

मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. ही चोरी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला.

निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:12

वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला . त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.

टोल नाक्यांवर थाटली वसुलीची दुकाने

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:25

रस्ते आणि पूल बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) योजना आणली आणि राज्यातील नाक्यानाक्यांवर टोलच्या नावाखाली वसुलीची दुकानेच थाटली आहेत.