मेंदूज्वराचं थैमान; महिन्यात १७ बालकं मृत्यूमुखी

Last Updated: Thursday, July 26, 2012, 08:06

नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यांमध्ये मेंदूज्वराचा उद्रेक झाला असून त्यामुळे गेल्या एका महिन्यात सतरा बालकांचा मृत्यू झालाय.

अग्नितांडवाचे पाच बळी

Last Updated: Friday, June 22, 2012, 13:34

मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.

शिर्डीहून येताना भाविकांचा अपघात, ५ ठार

Last Updated: Sunday, May 13, 2012, 08:57

अहमदनगर जिल्ह्यातल्या मनमाड रोडवर राहुरीजवळ टाटा मॅजिकला झालेल्या अपघातात ड्रायव्हरसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेले पाचही जण भाविक शिर्डीहून शनी शिंगणापूरला निघाले होते.

२५ वर्षीय फुटबॉलपटूचे हद्यविकाराने निधन

Last Updated: Sunday, April 15, 2012, 18:24

इटलीमध्ये सुरू असलेल्या सिरीया ए लीगमधील सेकंड क्लास फुटबॉल मॅचदरम्यान लिव्हर्नो टीममधील डिफेंडर प्लेअर पिअरमारियो मोरोसिनी याचं मैदानावरचं फुटबॉल खेळतांना हार्ट अटॅकनं निधन झालं.

ब्रम्हपुत्र मेलला अपघात, दोन मृत्यूमुखी

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 09:37

आज सकाळी ब्रम्हपुत्र मेल आणि एका मालगाडी मध्ये टक्कर होऊन अपघात झाला, ट्रेनचा एक डब्बा घसरल्याने दोन जणांचा मृत्यु झाल्याचे समजते. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

हरियाणात स्कूलबसला अपघात ९ विद्यार्थी ठार

Last Updated: Monday, January 2, 2012, 13:53

आज सकाळी हरियाणामध्ये अंबाला येथील गुरू अर्जुनदेव पब्लिक स्कुलच्या स्कूल बसला अपघात झाला आहे. स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला, हा अपघात रस्त्यावर असणाऱ्या दाट धुक्यामुळे झाला आहे. त्यात ९ विद्यार्थ्यी ठार झाले आहेत.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात ६ ठार

Last Updated: Sunday, December 25, 2011, 08:39

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री एक भीषण अपघात झाला. काल रात्री १२:१५च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघात ६ जण जागीच ठार झाले तर १२ जण जखमी झाले आहेत.

थंडीने केला कहर, ३९ बळी

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 06:42

थंडीने आता हळूहळू आपला रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. उत्तरोत्तर थंडीचा कडाका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे थंडीमुळे सगळे जास्तच गारठले आहेत. थंडीचा वाढत्या तडक्यामुळे जवळजवळ ३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बुलढाणा अपघात, 16 मृत्यूमुखी, 35 जखमी

Last Updated: Monday, November 28, 2011, 12:11

आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ दोन लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

आंध्रप्रदेशमध्ये अपघात नांदेडचे सहाजण मृत्युमुखी

Last Updated: Friday, October 28, 2011, 08:50

आंध्र प्रदेशातील निजामाबादजवळ क्वालिसला झालेल्या अपघातात नांदेडच्या सहा जणांचा मृत्यू झाला.