मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 12:06

ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.

... आणि तिनं जीवन संपवलं!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 22:18

आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

ICU मध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या, वार्ड बॉयला अटक

Last Updated: Saturday, May 10, 2014, 15:17

आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.

महिलेनं दिला कासवाला जन्म

Last Updated: Sunday, March 9, 2014, 16:04

छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.

त्वचेचा कॅन्सर ओळखणारं मोबाईल अॅप!

Last Updated: Monday, December 23, 2013, 10:32

आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सायन्सला मदत करणारं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केलं सून त्यामुळं त्वचेच्या कॅन्सरचं निदान करणं सोपं होणार आहे.

अनोखा रेकॉर्ड : महिलेनं एकाच वेळी दिला दहा भ्रुणांना जन्म!

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 09:54

मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. इथल्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पीटलमध्ये २८ वर्षीय अंजू कुशवाहा या महिलेनं एकाच वेळेस दहा मुलांना जन्म दिला.

... तर मनसे खळ्ळ खट्याक करणार!

Last Updated: Monday, December 16, 2013, 19:13

राज्यातल्या औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळालाय. तर दुसरीकडे मनसेनं या बंदविरोधात भूमिका घेतली आहे.

खूशखबर: औषध विक्रेत्यांचा संप मागे

Last Updated: Monday, December 16, 2013, 19:03

राज्यातल्या औषध विक्रेत्यांचा संप मागे घेण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनननं ही घोषणा केली.

मेडिकल बंद; संकटसमयी इथं साधा संपर्क...

Last Updated: Monday, December 16, 2013, 13:01

राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. या तीन दिवसांच्या संपामध्ये रुग्णांना काही अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

आजपासून तीन दिवस मेडिकल राहणार बंद!

Last Updated: Monday, December 16, 2013, 10:06

राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार आहेत.

विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन

Last Updated: Monday, October 14, 2013, 20:33

आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.

मुंबईमध्ये आता २४ तास हॉटेल, मेडिकल सुरू राहणार

Last Updated: Friday, October 4, 2013, 14:08

मुंबईमध्ये आता रात्रीही हॉटेल, मेडिकल आणि दूधविक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. नुकताच यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

आसाराम बापूंचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात करणार सादर

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:09

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेले संत आसाराम बापू यांचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. काल जोधपूरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये आसाराम बापूंचा एमआरआय काढण्यात आला. आसाराम बापू मागील १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मुंबई गँगरेप : `ती`ची प्रकृती स्थिर, धक्का मात्र कायम!

Last Updated: Friday, August 23, 2013, 19:37

मुंबईत सामूहिक बलात्काराला बळी पडलेली पत्रकार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु तिला जोरदार मानसिक धक्का बसलाय.

स्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!

Last Updated: Monday, August 12, 2013, 11:38

अचानक पेट घेणारे तीन महीन्याचे राहूल नावाचे मूल गुरूवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या आश्चर्यजनक घटनेने डॉक्टरांनादेखील धक्का बसला आहे.

औषधविक्रेतांचा देशभरात संप; सामान्यांचे हाल

Last Updated: Friday, May 10, 2013, 08:47

व्यापारी आणि प्राध्यापकांनी संप करून जनतेला वेठील धरलं असताना आज औषध विक्रेत्यांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलाय.

सलमाननं खोटं मेडिकल सर्टिफिकेट सादर केलं?

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 13:52

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयानं सलमानला तूर्तास दिलासा दिला असला तरी त्याच्यापुढील अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. आता कोर्टात सादर केलेलं मेडिकल सर्टिफिकेट सलमानला गोत्यात आणू शकतं.

औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर होणार कारवाई

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 20:16

रूग्णाला डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली आहेत ती औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर (औषध दुकानदार) कारवाई होणार आहे. ठरावीक कोर्स असताना गोळ्यांचे पूर्ण पाकीट घेण्याची केमिस्ट सक्ती करतात. त्यामुळे रूग्णांना नाहक भुर्दंड होतो. आता याला चाप बसणार आहे.

३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

Last Updated: Friday, January 18, 2013, 22:43

भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.

औषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:14

अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.

बीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे

Last Updated: Monday, June 4, 2012, 17:34

बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

शिक्षणसम्राटांना कायदेशीर चाप

Last Updated: Thursday, November 17, 2011, 04:18

शैक्षणिक संस्थेनं विद्यार्थ्याकडून कॅपिटेशन फी उकळल्यास एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना नव्या सीईटमधून सूट मिळणार का?

Last Updated: Thursday, November 10, 2011, 18:01

वैद्यकीय शाखेच्या पदवी आणि पद्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २०१२-२०१३ मध्ये घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्टमधून सूट देण्यात यावी या महाराष्ट्र राज्याने केलेली विनंतीचा विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. यासंदर्भात उद्या सूनावणी होणार आहे.