स्वागत " आयएनएस चक्र " चे

Last Updated: Monday, January 30, 2012, 20:58

अमित जोशी
संरक्षण दलात कुठलेही एखादे मोठे नवीन शस्त्र म्हणजे लढाऊ किंवा मालवाहू विमान, रणगाडा किंवा युद्धनौका दाखल करुन घेतले जाते तेव्हा अगदी वाजत गाजत, समारंभाद्वारे सेवेत दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो.

आनंद परांजपेंचा जय महाराष्ट्र

Last Updated: Monday, January 23, 2012, 00:44

मंदार मुकुंद पुरकर
शिवसेनेने आनंद परांजपे अंगी कोणतेही राजकीय कसब नसताना केवळ प्रकाश परांजपेंचे वारसदार म्हणून उमेदवारी दिली. आधी ठाणे आणि नंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांना विजय मिळवता आला तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य एकनिष्ठ शिवसैनिकांनी जीवाचं रान केल्यामुळेच.

गावात काय आहे?

Last Updated: Saturday, January 28, 2012, 13:17

अमोल जोशी
मी गावात राहतो. जन्मापासून. गावातल्या शाळेत शिकलो. कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो. ग्रॅज्युएट झालो. सेकंड क्लास मिळाला. घरची परिस्थिती बेताची. ग्रॅज्युएट झालो तेव्हा वडील शेती करायचे. थकले होते.

शिवसेनाप्रमुख आणि मी !

Last Updated: Thursday, November 15, 2012, 18:02

संतोष गोरे
२६ सप्टेंबर १९९३. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो.

त्वमेव केवलम् कर्तासी..

Last Updated: Thursday, January 26, 2012, 12:18

ऋषी देसाई
बाहेर जितेंद्र आहे, त्याला घेऊन ये. ... आणि त्याच्या सोबत एक एमपी पण आहे त्यालाही घेऊन ये. आणि माईकवर तुम्ही काही बोलू नका.. खरतर पवार माईक दूर करुन बोलत होते. खरं तर पवारांच्या हातातला माईक पक्षाशी बांधील होता, पण ओघात हे विसरले की, त्या पत्रकार परिषदेत पवारांच्या समोर टेबलावर ठेवलेले मिडियाचे बूम हे कुठल्याच पक्षाचे नसतात.

पानिपत आणि १४ जानेवारी...

Last Updated: Friday, January 13, 2012, 16:59

ऋषी देसाई
खरतर आपल्या कॅलेंडरच्या पानापानावर प्रत्येक दिवशी इतिहासातल्या एकतर आठवणीची किवा भुतकाळातल्या त्या दिवशीच्या आठवणीची नोंद असतेच. अशा ३६५ दिवसातला महाराष्ट्राचा स्वत:चा दिवस म्हणजे १४ जानेवारी. कारण याच दिवशी जोडला गेलाय संदर्भ पानिपताचा.

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची वेगळी बाजू!

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 23:24

मंदार मुकुंद पुरकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता.

भविष्यातील " अवकाश स्थानक "

Last Updated: Saturday, February 4, 2012, 12:09

अमित जोशी
२९ सप्टेंबर २०११ हा दिवस कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता.

असे पाहूणे येती...

Last Updated: Thursday, January 5, 2012, 17:26

'पाहूणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहूणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहूणे म्हणून जातोच ना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.

भारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत

Last Updated: Thursday, December 29, 2011, 16:26

जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.