लाचखोर गजानन खाडेचं २ कोटींपेक्षा जास्त घबाड

Last Updated: Thursday, September 19, 2013, 16:05

औरंगाबादेतील लाचखोर अधिकारी गजानन खाडेला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. तर दुसरीकडे खाडेच्या संपत्तीचा आकडा वाढतच चाललाय. दुसऱ्या दिवशी गजानन खाडेच्या संपत्तीची मोजदाद सुरुच होती. आत्तापर्यंत खाडेकडे जवळपास २ कोटींची संपत्ती सापडलीय.

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:28

काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीवर पोलिसाकडून बलात्कार

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 14:44

जळगावात रक्षकच भक्षक बनल्याची घटना उघडकीला आली आहे. पोलीस मुख्यालयात नियुक्तीवर असलेल्या गणेश पाटील या पोलीस शिपायाने १७ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केला.

शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!

शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 22:34

शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत यांच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खराब रस्त्यांचा फटका, १५० मर्सिडिज बंगल्याबाहेर!

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 19:13

एकाच दिवशी १५० मर्सिडिज खरेदी करून औरंगाबादच्या उद्योजकांनी शहराला एक वेगळी ओळख दिली. मात्र शहरातील खराब रस्त्यांमुळं गाडीवर होणारा खर्च पाहता आता या सर्व गाड्या बंगल्यातील शोभेची वस्तू बनून राहिल्यात.

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर

Last Updated: Friday, September 6, 2013, 14:46

जालना वाटूर रोडवरच्या टोलनाक्यावर जालन्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नूर खान यांनी तोडफोड केल्याचा आरोप कल्याण टोलवेज कंपनीकडून करण्यात आला आहे. यावेळी जमावाच्या हातात तलवारी आणि दंडुके असल्याचे पाहायला मिळत आहेत.

चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 16:05

यवतमाळमध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकं दगावलीयत. चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे कुंदन राठोड, प्रथमेश बीबेकर या दोन बालकांना आपला जीव गमवावा लागलाय.

जळगाव पालिकेत मनसे किंगमेकर, भूमिकेकडे लक्ष

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 09:32

जळगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसलं तरी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला सर्वात जास्त ३३ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेनंही जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळ सत्ता स्थापनेसाठी जैन आणि मनसे एकत्र येणार की मनसे-भाजप-राष्ट्रवादीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात येणार याबाबत उत्सुकता आहे.

शाळकरी मुलींचं `अपहरण`नव्हे, तर `आशिकी-२`!

Last Updated: Monday, September 2, 2013, 19:09

अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणा-या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल. पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलीसांनी घेतलाय.

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले

Last Updated: Friday, August 30, 2013, 10:07

अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.