मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचा भंग!

Last Updated: Saturday, October 13, 2012, 20:35

औरंगाबदमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचा भंग झाल्याची घटना घडली आहे. विद्यापीठाची परीक्षा सुरू असतांना या सरस्वती भुवन कॉलेजच्या पटांगणात १२ बलुतेदार संघटनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

नांदेडमध्ये आज मतदान

Last Updated: Saturday, October 13, 2012, 23:13

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळीही चित्र फारसं वेगळं असण्याची शक्यता नाही. मात्र आदर्श घोटाळ्याचा आरोप झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

टगेगिरीनंतर आता ताईगिरी

Last Updated: Friday, October 12, 2012, 16:26

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची टगेगिरी सर्वांनाच माहित झाली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ताईंची अरेरावी ही दिसून आली. खासदार सुप्रिया सुळेंची ताईगिरी येथे दिसली.

दहशतवादाचं जाळं खंडीत... असदच्या भावाचीही झाडाझडती

Last Updated: Friday, October 12, 2012, 16:34

औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे.

सेना-मनसे एकत्र यावी बाळासाहेबांची इच्छा

Last Updated: Friday, October 12, 2012, 12:24

हे चित्र सत्यात यावं अशी तमाम मराठी माणसांची इच्छा असल्याचे अनेक पोस्टर आपण पाहिले आहेत. पण आता मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: ही इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.

दहशतवादाचं औरंगाबाद-मराठवाडा कनेक्शन….

Last Updated: Friday, October 12, 2012, 09:41

पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर, दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालंय. दिल्लीत पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा मराठवाड्याशी संबंध आहे तर असद खान हा औरंगाबादपासून जवळ असलेल्या नायगाव गावातील तवक्कल नगरमधला रहिवासी आहे.

मुंबईत बिहारींसाठी हवं बिहार भवन, मनसेचा विरोध

Last Updated: Thursday, October 11, 2012, 17:21

मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमिन द्यावी, अशी मागणी बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलीये.

मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप

Last Updated: Monday, October 8, 2012, 22:31

औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दादा-बाबांचा वाद; अधिकारी पडले चाट

Last Updated: Friday, September 21, 2012, 16:07

औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनाचा वाद शिगेला पोहचलाय. हॉस्पिटलच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झालाय.

मुंडेंकडे महाराष्ट्र भाजपची सूत्रे

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 10:11

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र भाजपाची सूत्रे सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंडेना डावले गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण उभे केले होते. त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीत गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून पद्धतशीरपणे बाजुला केले गेले होते.