मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

मद्यधुंद तरूणी बॉइज होस्टेलवर मुक्कामी

Last Updated: Sunday, November 4, 2012, 09:20

मुंबईत राहणाऱ्या सध्या अमरावतीत शिक्षण घेत असलेल्या तीन मुलींचे प्रताप आईवडिलांना चकीत करणारे लावणारे आहेत. ‘बॉइज होस्टेल’मध्ये मुक्कामी राहून मद्यधुंद अवस्थेच डीजेचा ताल धरणाऱ्या या कॉलेज तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील काही मुले ही दिल्ली आणि बिहारची आहेत.

परभणीत महिला पोलिसाची हत्या

Last Updated: Friday, November 2, 2012, 14:01

परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

प्रमोद महाजनांच्या आठवणींना उजाळा

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 08:26

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उस्मानाबादेत राष्ट्रीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, खासदार वरुण गांधी, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

औरंगाबाद महापालिकेत महापौर कुणाचा?

Last Updated: Monday, October 29, 2012, 11:27

औरंगाबाद महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची आज निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदासाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. मुख्य लढत मात्र य़ुती विरोधात आघाडी अशीच होणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात

Last Updated: Sunday, October 28, 2012, 21:50

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.

कालव्यांच्या पाण्यावरून `रास्ता रोको`

Last Updated: Sunday, October 28, 2012, 12:28

अहमदनगर-मनमाड मार्गावर आज सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको केला. ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र उन्हाळी हंगामात गोदावरी कालव्यांना दोन आवर्तन मिळावी’, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

पैसे कसे खावेत, हे अजितदादांकडून शिकावे- मुंडे

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:05

पैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठी लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना मारला.

भंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी

Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:30

तहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.

डॉक्टरला जिवंत जाळलं... आरोपीला अटक

Last Updated: Thursday, October 18, 2012, 11:46

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगावमध्ये बुधवारी एका डॉक्टरला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमध्ये अटक केलीयं.