चार दहशतवाद्यांना अटक, नांदेडमध्ये एटीएसची कारवाई

Last Updated: Saturday, September 1, 2012, 08:29

पुणे बॉम्बस्फोटानंतर एटीएसने आपला मोर्चा पुन्हा मराठवाड्याकडे वळवला. त्यामुळे इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याच्या संशयावरून चार तरुणांना औरंगाबाद-नांदेड येथील एटीएसच्या पथकांनी शुक्रवारी नांदेडमध्ये अटक केली.

नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार?

Last Updated: Thursday, August 30, 2012, 09:21

वाघाळा शहर महापालिकेची निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच महापालिकेची निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.

प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत

Last Updated: Saturday, August 25, 2012, 15:06

पैशाचे आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत दाखल झाले आहे. त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेवून सेनेत प्रवेश केला.

गर्भलिंग निदान करणारा डॉ. भोपळे मोकाट

Last Updated: Friday, August 24, 2012, 10:37

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणा-या डॉ. सुभाष भोपळेचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतरही त्याला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे डॉ. भोपळेवर कुणाचा राजकीय वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

धुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:58

धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.

औरंगाबादेत खतरा, हमखास चावणार कुत्रा

Last Updated: Thursday, August 16, 2012, 14:10

औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या हैदौस घातला आहे, बाईकवर जाताना कुत्रा हमखास मागे लागतो असे काहीसे चित्र आहे. य़ा मोकाट कुत्र्यांनी गेल्या सात महिन्य़ात दोन हजार लोकांचे लचके तोडले आहेत.

धुळ्यातील पीकपाणी

Last Updated: Thursday, August 16, 2012, 08:30

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

विलासराव अनंतात विलीन, महाराष्ट्रावर सुतकी कळा

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 17:12

केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील घराजवळील वडीलोपार्जित शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलासरावांचे मृत्यूपत्र सहा महिन्यापूर्वीच होते तयार...

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 14:22

विलासराव देशमुख यांना रूग्णालयात दाखल करून काही दिवस होत नाही तोच ते हे जग सोडून गेले. विलासराव यांचे निधन साऱ्यांनाच धक्कादायक होते.

आज विलासरावांवर अंत्यसंस्कार

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 09:07

केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचं पार्थिव चेन्नईहून लातुरात आणण्यात आलय. आज दुपारी चार वाजता बाभळगावात शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांचं चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झालं.