विलासराव गेले, बाभळीची गढी ओस...

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 16:05

गावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री असा विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवास करत विलासरावांनी राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

हे काय चाललंय महाराष्ट्रात?

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 14:59

छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केलीय तर नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आलीय.

औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचं संकट

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 08:16

औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....

उपाचाराअभावी महिलेची भर रस्त्यात प्रसुती

Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:37

सरकारी रूग्णालयातील अनागोंदी कारभार आणि त्यामुळे होणारा त्रास हूी बाब नित्याचीच झाली आहे. मात्र औरंगाबादमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिरंगाईमुळे महिलेची रस्त्यातच उघड्यावर प्रसूतूी झाली.

पैसे दिले नाही, आईचा केला खून

Last Updated: Monday, August 6, 2012, 13:47

अंबाजोगाई येथे मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी चार लाख रुपये देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईचा खून केला.

दांडीबहाद्दर आमदारांत काँग्रेसची बाजी

Last Updated: Saturday, July 28, 2012, 12:46

मराठवाड्यातील आमदार विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेच्या अहवालातच समोर आलंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील विधानसभेच्या ५१ आमदारांपैकी ५० टक्के आमदारांनी कामकाजाला दांडी मारली. या दांडीबहाद्दर आमदारांमध्ये पहिला नंबर पटकावलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी

क्राइम ब्रांच काढतेय अबू जिंदालची माहिती

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 22:21

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अबु जिंदालने क्राइम ब्रांचचा तपासात खुलासा केलाय.. 2006 साली औरंगाबादमध्ये हत्यारांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर अबु जिंदाल हा मालेगांवला पळून गेला होता. तिथं तो एका मित्राच्या मदतीनं मशिदीमध्ये थांबला.

ऐतिहासिक बुद्ध लेण्या धोक्यात

Last Updated: Saturday, July 21, 2012, 18:32

औरंगाबादच्या बुद्ध लेणी परिसरातल्या पायथ्याशीच वीटभट्टी मालकांकडून खोदकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे.

...अन् 'रिंगण' पूर्ण झालं

Last Updated: Thursday, July 19, 2012, 06:59

संत म्हटले की फक्त आत्मा, परमात्मा, देव, धर्म याच गोष्टी येऊन आदळतात. पण अध्यात्मापेक्षा आजच्या काळात त्यांचा सामाजिक विचारच अधिक महत्त्वाचा आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी सोमवारी संध्याकाळी नांदेड येथे केले.

'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'

Last Updated: Sunday, July 15, 2012, 00:01

‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.