सेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचा पर्दाफाश!

Last Updated: Thursday, May 17, 2012, 21:58

एरव्ही मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठीप्रेम कीती बेगडी आहे, याचा नमुनाच औरंगाबादेत पहावयास मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात.

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:56

राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही.

आमदार सत्तारांविरोधात गुन्हा

Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:47

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांच्या पत्नीसह इतर दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऊ भाविकांवर काळाचा घाला

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 13:01

जळगाव जिल्ह्यात कंटेनरने चिरडल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक मुक्ताईनगरला जात होते.

काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची

Last Updated: Monday, May 14, 2012, 17:55

सत्ताधारी आमदारांमध्येच आता कुरघोडीचं राजकारण रंगू लागलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.

तुळजाभवानीच्या चरणी, सोन्या-चांदीची नांदी..

Last Updated: Monday, May 14, 2012, 09:15

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या चरणी २२५ किलो चांदीची मूर्ती आणि पावणे दोन किलो सोन्याचे अलंकार अर्पण करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

कुटुंबाला डाकिण ठरवून विष पाजलं

Last Updated: Saturday, May 12, 2012, 16:40

नंदूरबार जिल्ह्यात एका कुटुंबाला गावक-यांनी डाकिण ठरवलं. गावात झालेल्या तीन मृत्यूसाठीही वसावे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या मुलावर विष प्रयोग करण्याचा धक्कादायक प्रकारही करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून वेरी गावातल्या वेसावे कुटुंबाला डाकिण ठरवून अत्याचार सुरू आहेत.

सोलापूरला धरणाचे पाणी देण्याचा निर्णय रद्द

Last Updated: Friday, May 11, 2012, 11:45

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना-कोळेगाव धरणातून सोलापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा दिलेला निर्णय राज्य सरकारनं अखेर रद्द केला आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. मात्र, राज्य सरकरारच्या निर्णयाबाबत आमदार दिलीप माने यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलनाबाबत चर्च ा केल्यानंतर दिशा ठरविली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे २० बळी

Last Updated: Friday, May 11, 2012, 11:14

अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भाला चांगलेचे झोडपून काढले. वादळवार्‍यासह आलेल्या पावसाने बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे आणि बुलडाणा जिल्ह्यात २0 जणांचे बळी घेतले आहेत. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसाने गुरुवारी खान्देशातही थैमान घातले.

शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 14:00

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडायला उस्मानाबादकरांनी विरोध केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार दिलीप मानेंनी केलेल्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी सोडण्यासाठी आलेल्या अभियंत्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले