पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक

Last Updated: Saturday, June 2, 2012, 09:17

औरंगाबाद इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या (गणित, तृतीय सत्र) पेपरफुटी प्रकरणाचा अखेर तपास लागलाय. याप्रकरणी विद्यापीठाचा कर्मचारी सचिन साळुंकेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन हा विद्यापीठातील स्ट्राँगरुममध्ये मदतनीस म्हणून काम करीत होता.

कथा..सोलापुरातील अदृश्य किल्ल्याची

Last Updated: Friday, June 1, 2012, 11:02

कथा आहे, सोलापूरमधील एका अदृश्य किल्ल्याची. शनिवारवाड्यापेक्षा मजबूत असणारा किल्ला अचानक दिसू लागलाय. तो चक्क पाण्यात. झी 24 तासनं सातशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा दिला.

'स्वच्छ औरंगाबाद'साठी महापालिका सज्ज

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 19:02

औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेनं आता कंबर कसली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर शहरातील रस्त्यावर कचरा टाकणा-यास दंड आकारण्यात येणार आहे.. याकरीता महापालिकेचे भरारी पथकही स्थापण करण्यात येणार आहे आणि या भरारी पथकाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे

डॉ. सुदाम मुंडेनी दिली पोलिसांनी तुरी

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 15:49

परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.

आरोपी सलीम कुत्ताचा जेलमध्ये गँगवार

Last Updated: Monday, May 28, 2012, 11:50

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील खतरनाक आरोपी सलीम कुत्ता व त्याच्या गँगने कैदी सचिन तायडे व डॉ. सचिन पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये सचिन तायडे हा गंभीर जखमी झाला आहे.

सोलापूरला पाणी देणार नाही, परांडा बंद

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:09

मुख्यमंत्र्यांनी सीना कोळेगाव धरणातील पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ परांडा शहर बंद करण्याचं आवाहन सर्वपक्षिय नेत्यांकडून करण्यात आल आहे.

औरंगाबादमध्ये २३६ कैदी फरार

Last Updated: Saturday, May 26, 2012, 14:52

औरंगाबादच्या हसरूल जेलमधील पॅरोल रजेवर गेलेले २३६ कैदी फरार झाले आहेत. या कैंद्यांना शोधण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू आहे. या कैंद्यांच्या जामीनदारांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचं कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

धरण्याच्या पाण्यावरून होणार राडा?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 22:59

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसर आणि परांडा शहरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात, १०० जखमी

Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:51

परभणी जिल्ह्यातल्या सातोना-उस्मापूर स्टेशनवर उभ्या असलेल्या नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात झाला आहे. पॅसेंजरला एका इंजिननं धडक दिल्यानं १०० प्रवासी जखमी झाले आहेत.

पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...

Last Updated: Thursday, May 24, 2012, 12:57

पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता... मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...