Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:00
उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातील कारकुनांच्या करामतीमुळं जिवंत पोलिसालाच मयत दाखवण्याचा संतापजनक प्रकार घडलाय. स्वेच्छानिवृत्ती घेणा-या या पोलिसाला यामुळं मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 09:17
राजकीय दबावामुळं अतिरेक्यांपेक्षा पोलिसांची जास्त दहशत असल्याची घणाघाती टीका अण्णा हजारेंनी परभणीत केली आहे. त्यामुळं पोलीस विभाग लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याची गरज असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
Last Updated: Monday, May 7, 2012, 16:58
सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.
Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Last Updated: Saturday, May 5, 2012, 13:05
औरंगाबादच्या मुकुंदवाडी चौकातील पीव्हीआर थिएटरजवळ मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत 32 टप-या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. आग इतकी भीषण होती की अगदी तासाभरातच या टप-या बेचिराख झाल्या.
Last Updated: Saturday, May 5, 2012, 08:59
महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.
Last Updated: Thursday, May 3, 2012, 18:03
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, आमदारांच्या परदेश दौऱ्याला राज ठाकरें पाठोपाठ अण्णा हजारेंनीही विरोध दर्शवला आहे.परदेशदौरे करणाऱ्यांना गावबंदी करावी.
Last Updated: Thursday, May 3, 2012, 08:33
सक्षम लोकायुक्तांसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अण्णांनी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर तोफ डागली आहे. पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही असा टोला अण्णांनी हाणला आहे.
Last Updated: Tuesday, May 1, 2012, 19:46
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे, अनेकांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो आहे. तर लातूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याने रस्ते धुतले जात असल्याचं समोर आलं आहे.
Last Updated: Wednesday, April 25, 2012, 16:17
औंरगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका घराचं छत कोसळल्यानं दोघा मुलांचा मृत्यू झालाय. या कारवाईदरम्यान छत कोसळल्यानं तीन मुलं अडकून राहिली होती. त्यांच्यापैकी एकालाच वाचवण्यात यश आलंय, आणि दोघांचा मृत्यू झालाय.
आणखी >>