गौरवच्या पंखांना हवं आर्थिक बळ

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 20:09

औरंगाबादच्या एका रिक्षा चालकाच्या मुलाने असामान्य कामगिरी केली आहे. बल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली आहे. मात्र गौरवला ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी गरज आहे ती आर्थिक मदतीची.

घरकुल घोटाळा : महापौरांची कसून चौकशी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 13:26

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आलीए. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 13:49

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी सुरूच आहे. सैय्यद अली कादरी या आरोपीला चौधरी यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

रस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !

Last Updated: Friday, February 10, 2012, 11:24

औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.

आर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !

Last Updated: Friday, February 10, 2012, 08:44

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

राज्यात थंडीचा पहिला बळी

Last Updated: Thursday, February 9, 2012, 12:20

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आतापर्यंत थंडीचा राज्यात एक बळी गेला आहे. दरम्यान, येत्‍या २४ तासात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केली आहे.

नांदेडमध्ये मद्यपींना शिवसैनिकांचा दणका

Last Updated: Thursday, February 9, 2012, 08:20

नांदेडमध्ये भरचौकात असणाऱ्या दारू दुकानातल्या मद्यपींना शिवसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला. दारूच्या दुकानासमोरून जाणाऱ्या महिलांची छेड काढली जाई. दारूच्या बाटल्या फोडत मद्यपींना दुकानातच कोंडून टाकण्यात आलं.

उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 14:43

उस्मानाबाद जिल्ह्यात मतदानाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जहांगीरवाडी तांडा या गावात हा प्रकार घडला. पोलिंग एजंटच्या बसण्याच्या जागेवरून वादावादीला सुरुवात झाली आणि अखेरीस हाणामारीपर्यंत वाद गेला.

अहमदनगरमधील झेडपी निवडणूक

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:47

आहमदनगर जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १५० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आज सकाळी आपल्या लोणी या गावी मतदानाचा हक्क बजावला.

गोपीनाथ मुंडेंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 15:45

माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा राष्ट्रवादीचा कट रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे