मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:37

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

मुंडे वाद टोकाला, गाड्यांवर दगडफेक

Last Updated: Monday, February 6, 2012, 22:26

बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या काका पुतण्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक उद्या होत असताना वर्चस्वासाठी दोन्ही मुंडेमध्ये संघर्ष पेटला आहे.

विलासरांवाची नक्कल, मुंडें अडचणीत?

Last Updated: Monday, February 6, 2012, 20:19

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी झेडपीच्या निवडणूक प्रचारात वीजचोरीचं समर्थन करणारं खळबळजनक विधान केलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे परम मित्र समजल्या जाणाऱ्या विलासरावांची नक्कल करत त्यांच्यावर टीकाही केली आहे.

औरंगाबादेत ग्राहकांची नाणे घाटात कोंडी

Last Updated: Sunday, February 5, 2012, 15:03

औरंगाबादच्या बाजारपेठेत एखाद्या व्यापा-याकडून वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्याकडे सुटे पैसे शिल्लक राहिल्यासतुमच्या हाती एखादं कुपन पडेल...

नळदुर्गजवळ भीषण अपघातात ८ जण ठार

Last Updated: Sunday, February 5, 2012, 16:32

सोलापूर बंगलोरमहामार्गावर नळदुर्गजवळ ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात आठ जण मृत्यू झाला तर १५ जण जखमी आहेत.

माता तू न वैरिणी...

Last Updated: Sunday, February 5, 2012, 13:08

उस्मानाबाद बस स्थानकाजवळ एक जिवंत अर्भक सापडलं आहे. गटाराच्या जवळ कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत हे अर्भक सापडलं. काही प्रवाशांनारात्री बाराच्या सुमारास याठिकाणी बाळाच्या रडण्याचा आवाज आला

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

Last Updated: Saturday, February 4, 2012, 12:11

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी

Last Updated: Friday, February 3, 2012, 08:54

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.

उस्मानाबादमध्ये एम्बुलन्स-एसटीच्या अपघातात ५ ठार

Last Updated: Thursday, February 2, 2012, 10:00

उस्मानाबाद जवळ वडगाव इथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एम्बुलन्स आणि एसटीच्या धडकेत पाच ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेले गंभीर असल्याने ठार झालेल्या मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

परभणीत नर्सेसच्या नियुक्तीत घोटाळा

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 16:01

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकांच्या नियुक्तीबाबत भोंगळ कारभार समोर आला आहे. परिचारिकांना 2007पासून 18 महिन्याच्या कालावधीकरीता बाँडवर सेवेत असलेल्या कायम स्वरूपी असल्याचे भासवून सलग विनाखंड पाच वर्षे काम करवून घेतलं.