औरंगाबाद : आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:12

औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे.

गंगापूरमध्ये नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला

Last Updated: Friday, January 13, 2012, 16:00

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.

गर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास

Last Updated: Thursday, January 12, 2012, 21:45

बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संभाजी सेनेच्या स्थापनेत छावा संघटनेचा राडा

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 18:35

औरंगाबादेत संभाजी सेना नावाच्या संघटनेच्या स्थापना कार्यक्रमात जोरदार राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या हाणामारीत तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होईपर्यंत कार्यकर्त्यांना मारण्यात आलं.

११ महिन्याच्या मुलीची आजीने केली हत्या

Last Updated: Monday, January 9, 2012, 17:41

मुलगाच हवा ही मानसिकता कोणत्या थराला नेते त्यातून महिला महिलेची वैरीण कशी ठरते याचं हृदयद्रावक उदाहरण आज नांदेडमध्ये पहायला मिळालं. घरात सलग तिसरी मुलगी झाल्यावरून ११ महिन्याच्या चिमुरडीला तिची आजी आणि आत्यानंच आयुष्यातून उठवलं.

बीडः उसतोड मजुराला जिवंत जाळले

Last Updated: Monday, January 9, 2012, 14:32

उस तोडीसाठी घेतलेली उचल परत केली नाही म्हणून शेषराव तायडे या उस तोड मजुराला मुकादमाने जीवंत जाळल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिंदफणा चिंचोळी येथे घडली. या मजूराने वशिष्ठ डाकेकडून उस तोडीला जाण्यासाठी दहा हजार रुपयांची उचल घेतली होती.

धनंजय मुंडेंना बैठकीचे निमंत्रण नाही

Last Updated: Sunday, January 8, 2012, 08:41

आज मुंबईत होणा-या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत धनंजय मुंडे याना डावलण्यात आलं आहे.. भाजप आमदार धनंजय मुंडे याना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय पातळीवर निर्णय होईल अशी सारवासारव करणारी प्रदेश कार्यकारणी आजच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.

हुंड्यासाठी पत्नीला जाळणाऱ्या कुटुंबास जन्मठेप

Last Updated: Saturday, January 7, 2012, 20:49

हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पती, सासू आणि जावेला नांदेड कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय सौंदते त्याची आई सोनाबाई आणि बहिण इमलबाई असं या तिघा आरोपींची नावं आहेत.

अनोख्या लग्नाची गोष्ट

Last Updated: Saturday, January 7, 2012, 12:48

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असाह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाल्यानं दोन जीवांची नवी पहाट उदयास आली आणि एका अनोख्या लग्नाची गोष्ट झाली.

शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर

Last Updated: Friday, January 6, 2012, 17:47

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.