झी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:43

बनावट आणि विना परवाना खत विक्री करणाऱ्या एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं उस्मानाबादमध्ये उघड झालं आहे. उस्मानाबादमधल्या अंबेजवळगा परिसरातल्या शेतकऱ्यांनी बनावट खत विक्रेत्याला पकडून दिले मात्र उस्मानाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यानं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला.

राज यांनी दिला मुंबई हायकोर्टालाच सल्ला

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 11:18

मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी चक्क मुंबई हायकोर्टाला दिला आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.

धुळे अपघातात ५ ठार ८ जखमी

Last Updated: Saturday, December 31, 2011, 13:36

धुळ्यातील अपघातात ५ ठार झालेत. हा अपघात मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ आज पहाटे झाला. ट्रक- टेम्पो- सुमो या तीन वाहनांमध्ये धडक झाली. अपघातात ८ जखमींपैकी ३ जण गंभीर आहेत.

धनं'जय'ची गोपीनाथांवर 'मात'!

Last Updated: Monday, December 26, 2011, 17:28

परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.

सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट, २ ठार

Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:33

नांदेडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय क्रमांक -३ मध्ये रविवारी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

मुंडेंची काढणार पुतण्या विकेट

Last Updated: Saturday, December 24, 2011, 14:40

परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.

औरंगाबाद अपघातात ३१ प्रवासी जखमी

Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:10

अकोल्याहून पुण्याला जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघात ३१ प्रवाशी जखमी झालेत. औरंगाबाद येथे आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

मुंडेंच्या जावयांवर अपहरणाचा गुन्हा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 08:02

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडेंचे जावई आणि नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले मधुसुदन केंद्रे यांच्याविरोधात नगरसेवकाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस घेतायेत आरोपी उंदराचा शोध...

Last Updated: Thursday, December 22, 2011, 07:50

लातूरच्या सरकारी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. एका उंदराने ५० वर्षीय महिलेच्या डाव्या हाताची तीन बोटे, तर उजव्या हाताची दोन बोटे खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अण्णांच्या आंदोलनाला सूट देऊ नका - माणिकराव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 05:23

अण्णा हजारे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झाले असल्याने काँग्रेस पुन्हा धासतावले आहेत असेच दिसून येते, कारण की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अण्णाचे मुंबईत MMRDA मैदानात होणारे आंदोलनाला कोणत्याच प्रकारची सूट देऊ नये असे वक्तव्य केले आहे.