मला संपवण्यासाठी ३ जन्म घ्यावे लागतील- मुंडे

Last Updated: Thursday, January 19, 2012, 19:16

आज गोपीनाथ मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच विरोधकांना चागंलच फैलावर घेतलं. 'मला संपवण्यासाठी विरोधकांना तीन जन्म घ्यावे लागतील' असा प्रतिटोलाच गोपीनाथ मुंडे यांनी हाणला आहे.

घरं फोडायला, आम्ही काय दरोडेखोर आहोत - पवार

Last Updated: Thursday, January 19, 2012, 16:34

अजित पवारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडें यांच्यावर घणाघाती टीका केली. गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधु पंडितअण्णा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंडितअण्णा मुडें यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा मुंडेंच्या बालेकिल्ल्यातील शक्तीप्रदर्शनचं होतं.

काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे

Last Updated: Thursday, January 19, 2012, 16:11

आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.

आ.रामप्रसाद बोर्डीकरांना पोलीस कोठडी

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 23:12

परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील विमा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डिकर अखेर कोर्टात शरण आलेत. विमा घोटाळ्याप्रकरणी बोर्डिकर फरार होते

नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 18:25

नांदेड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या किकी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

घरात वादावादी, सभेत 'राष्ट्रवादी' !

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 17:19

गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा

Last Updated: Monday, January 16, 2012, 18:04

मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

मुंडे घराण्यात 'भाऊबंदकी'

Last Updated: Monday, January 16, 2012, 14:20

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत.

दलित समाजाला बंदुकीची परवानगी ?

Last Updated: Monday, January 16, 2012, 09:25

ग्रामीण भागातल्या दलित समाजाला स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवानगी मिळाले पाहिजे अशी मागणी रिपाइं नेता रामदास आठवले यांनी केली आहे.

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:49

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.