कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 03:12

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

माणिकरावांना दादांचा ' दे धक्का'

Last Updated: Monday, November 14, 2011, 11:22

माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय

Last Updated: Monday, November 14, 2011, 07:42

ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.

दिवसाढवळ्या दुकानात लूट!

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 05:24

औरंगाबादमध्ये मंदिराचा कळस चोरून नेण्याच्या घटनेला १२ तासही उलटले नाहीत तोवर एका व्यापा-याचे दिवसाढवळ्या ११ लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे. लागोपाठ चोरीच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबदच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

केजरीवाल यांना काळे झेंडे

Last Updated: Sunday, November 6, 2011, 10:17

अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमात घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्य़ाचा प्रयत्न केलाय. यावेळी केजरीवाल यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.

साखर उद्योगावर शरद पवारांची भविष्यवाणी

Last Updated: Sunday, November 6, 2011, 07:29

ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

खड्ड्यांना मिळाला पूजेचा मान

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 08:52

खड्ड्यांनी साऱ्यांचे जगणं नकोसं केल आहे, दरवर्षी या खड्डयामुळे मोठ्याप्रमाणात गैरसोय होते, त्यामुळे लातुरमध्ये या खड्ड्यांचे काय करयाचे या प्रश्नाने सारेच भंडावले होते. आणि त्यासाठीच भाजपने यासाठी वेगळीच शकल्ल लढवली आहे.लातुरातील प्रभाग क्रमांक १२ मधील रस्त्यांवर खड्डयांची श्रृंखला वाढली आहे. वारंवार पाठपुरावा करुनही त्यांची दुरुस्ती होत नसल्याने शहर भाजपतर्फे या खड्डयांची महापूजा करुन पालिकेचा निषेध नोंदविण्यात आला.

दिवाळीत रेल्वेप्रवाशांचे झाले हालहाल

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 07:14

दिवाळीचा सुट्टी आणि रेल्वे गाड्यांची गर्दी हे चित्र दरवेळेसच पाहता येतं, नेहमीप्रमाणे रेल्वेचा ढिसाळ कारभार यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेमध्ये गर्दी दिसून येत होती. दिवाळीनंतर पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

हिंगोली पालिका निवडणूक जाहीर, आचारसंहिता सुरू

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 05:52

हिंगोली, कळमनुरी व वसमतनगर पालिकेच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. आलेल्या अर्जांची २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येणार आहे.