कोकणच्या चाकरमान्यांना `मरे` पावली!

Last Updated: Monday, July 29, 2013, 23:46

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.

तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलं

Last Updated: Sunday, July 28, 2013, 11:33

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरूनं तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलंय. उल्हासनगरमधल्या शिवाजी चौक या परिसरात ही घटना घडलीय.

मुदत संपलेल्या औषधांमुळे शाळकरी मुलांना विषबाधा

Last Updated: Saturday, July 27, 2013, 22:43

डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

ठाणेकरांसाठी ऑगस्ट 'बॅनर'बाजीचा!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 09:09

ऑगस्ट महिना ठाणेकरांसाठी मोठ्या पर्वणीचा महिना ठरणार आहे... कारण तब्बल 6 ठाणेकर नेत्यांचे वाढदिवस या महिन्यात आहेत आणि गोकुळ अष्टमीही... त्यामुळे ठाणेकरांचा हा महिना एकदम मस्त जाणार हे नक्की आहे...

शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव!

Last Updated: Saturday, July 27, 2013, 17:47

कल्याण डोंबिवली मुंब्रा बदलापूर विभागाला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे शीळफाटा ते महापे रस्ता. पण दरवर्षी या अतिमहत्त्वाच्या रस्त्याची चाळण होते.

पालघरमध्ये शिक्षकांची शाळेला दांडी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 23:31

पालघर तालुक्यात सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडालाय. अनेक जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत..तर जिथे शिक्षक रुजु केलेत ते शाळेवर जात नसल्यानं 25 हजार विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारात सापडलय.

रायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:56

रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.

दरड कोसळल्याने माळशेज घाट बंद

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:47

माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:10

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

कोकणात भरती... जळगावात पावसाचे आकडे वरती

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:44

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.