कोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 14:11

कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.

ठाण्यात पावसाचा बळी, २५ गावांचा संपर्क तुटला

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59

ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.

२४ जुलै... जांभूळपाड्याचा ‘तो’ दिवस आणि आज!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28

२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 17:39

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 11:25

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 09:42

वसईतल्या खड्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्यातल्या खड्यात पडून या महिलेचा मृत्यू झालाय.

वसईकरांचा 'जीव' खड्ड्यात!

Last Updated: Monday, July 22, 2013, 19:16

वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...

`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी

Last Updated: Monday, July 22, 2013, 09:08

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर झालेत. कर्जत-सीएसटी लोकलमधून पडल्यानं ही दुर्घटना घडलीय.

कोकणात वर्षा पर्यटनाची धूम!

Last Updated: Sunday, July 21, 2013, 18:53

कोकणात सध्या वर्षा पर्यटनाची धूम सुरू झालीय... धो धो पावसामुळे धबधबे वाहू लागले असून, धबधब्यांमध्ये चिंब भिजताना आणि पार्ट्या झोडताना पर्यटकांना आनंदही ओसंडून वाहतोय.

बदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला

Last Updated: Sunday, July 21, 2013, 17:29

बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या लोकलचा महिलांचा डबा रूळावरून घसरला. दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ही घटना घडलीय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.