‘टीएमटी’चंही भाडं महागलं!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 10:21

ठाणे परिवहन सेवेच्या भाड्यामध्ये एक रुपयानं वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमेध्ये मंजुरी देण्यात आली आली आहे.

ट्रान्स हार्बरवर धावणार १२ डब्यांची रेल्वे

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:50

ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल मार्गावर लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खुशखबर. ठाणे-पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल्स आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळं या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे.

दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!

Last Updated: Monday, January 14, 2013, 15:47

भाईंदरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एका युवकाने दारुच्या नशेत मारहाण केल्याची घटना घडलीय. रविवारी रात्री ही घटना घडली. मारहाण झालेली महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 12:40

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

Last Updated: Monday, January 14, 2013, 11:32

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

साहित्य संमेलनात `मराठी` समृद्धीसाठी ठराव

Last Updated: Sunday, January 13, 2013, 23:34

८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय.

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 13:05

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

संमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ

Last Updated: Sunday, January 13, 2013, 21:18

चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.

.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे

Last Updated: Sunday, January 13, 2013, 16:32

सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'

Last Updated: Saturday, January 12, 2013, 07:02

चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.