आसनगाव – कसारा वाहतूक बंद, एक्सप्रेस गाड्या रद्द

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:38

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.

कसारा रेल्वे अपघात, १ ठार १५ जखमी

Last Updated: Friday, July 20, 2012, 09:04

मुंबईकरांसाठी कालची रात्र अपघातांची ठरली. एकीकडे कसाऱ्याजवळ विदर्भ एक्स्प्रेसनं लोकलला धडक दिल्यानं १ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.

कसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:52

मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.

स्वतःला मृत घोषित करून 'सिडको' भूखंड लाटला

Last Updated: Thursday, July 19, 2012, 20:18

स्वत:ला मृत घोषित करून सिडको अधिकार्‍यांच्या संगनमताने भूखंड हडप केल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन माजी व दोन विद्यमान अधिकार्‍यांसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी

Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:55

कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. तसेच श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

असं म्हणाले राज! 'उद्धव यांच्या भेटीवर'

Last Updated: Thursday, July 19, 2012, 07:05

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचा अर्धवट राहिलेला अलिबाग दौरा त्यांनी आज पूर्ण केला. मनसे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांची कार्यशाळा घेतली.

मनसे उमेदवारांना चिंता, मराठी मतदारांची वानवा

Last Updated: Sunday, July 15, 2012, 17:48

मीरा भाईंदर महापालिकेत सर्वच पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून रणसंग्राम सुरू असतानाच मनसेनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 95 जागांसाठी 140 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

ग्लायडिंग फ्रॉग... निसर्गाची किमया

Last Updated: Saturday, July 14, 2012, 15:35

बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.

रत्नागिरीत लेप्टोचं थैमान, प्रशासन सुस्तच!

Last Updated: Thursday, July 12, 2012, 09:08

रत्नागिरीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात लेप्टोची साथ पसरतेय. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. आरोग्य यंत्रणा लेप्टो निवारणासाठी प्रयत्नशील असताना जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसतंय.

गणेश मंडळांवर जबाबदारी, नाहीतर गुन्हा फौजदारी!

Last Updated: Thursday, July 12, 2012, 08:09

ठाण्यात गणेश मंडळांना रस्ते खोदण्याच्या मुद्द्यावरुन महापालिका आयुक्तांनी इशारा दिला होता. नवे रस्ते खोदले तर फौजदारी गुन्हे दाखल कऱण्याचा इशारा देण्यात आला होता.