मीरारोड-भाईंदरमध्ये आज मतदान

Last Updated: Sunday, August 12, 2012, 07:29

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपलाय. रविवारी महापालिकेच्या 45 प्रभागांच्या 95 जागांसाठी मतदान होणाराय. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर आपल्याच पक्षाची सत्ता येणार असा दावा उमेदवारांनी केलाय.

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:28

अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाप्पा पावला, कोकणासाठी जादा रेल्वे

Last Updated: Thursday, August 9, 2012, 20:51

कोकणात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चाकरमानी गावाचा रस्ता धरतात. मात्र, यावेळी दोन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण फुल झाले होते. त्यामुळे गावाला जायचे कसे, असा प्रश्न गणेश भक्तांना पडला होता. मात्र, हा प्रश्न निकालात निघाला आहे. कोकणात जाणा - या भाविकांच्यासुविधेसाठी मध्य रेल्वेने सीएसटी ते मडगाव मार्गासाठीदररोज ३८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे .

कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 09:15

तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

लॉजवर धाड, सेक्स रॅकेट उघडकीस

Last Updated: Sunday, August 5, 2012, 10:57

नवी मुंबईत गुन्हेगारीचं प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. नवी मुंबई सारख्या हाय प्रोफाईेल शहरांमध्ये वेश्या व्यवसाय करणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे.

उल्हासनगर महापालिकेत कायदे धाब्यावर

Last Updated: Saturday, August 4, 2012, 15:47

उल्हासनगर महापालिकेतल्या लोकप्रतिनिधींनीच कायदे धाब्यावर बसवल्याचं उदाहरण समोर आलंय. या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार गटनेत्यांच्या बेकयदेशीर नेमणुका केल्या आहेत.

ठाणे काँग्रेसला सुप्रीम कोर्टाची चपराक

Last Updated: Saturday, August 4, 2012, 11:53

ठाण्यातील काँग्रेसला सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा चपराक दिलीय. सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही तर दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादीचा असावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय.

वाघ्या जागच्या जागेवर, सुरक्षेत वाढ

Last Updated: Friday, August 3, 2012, 17:52

रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला आता पोलिसांचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलंय. संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा उखडून टाकल्यानंतर पुतळ्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

'वाघ्या' आपल्या जागेवर पुन्हा विराजमान

Last Updated: Thursday, August 2, 2012, 12:49

रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडचा विरोध न जुमानता प्रशासनानं हा पुतळा बसवलाय. तर दुसरीकडे वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

'वाघ्या'वर घातला संभाजी ब्रिगेडने 'दरोडा'?

Last Updated: Thursday, August 2, 2012, 12:16

वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.