रायगडमध्ये अतिसाराची साथ

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:30

रायगड जिल्ह्यात चौक गावात अतीसाराची साथ आली आहे. दूषित पाण्यानं ही साथ आल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी साथ अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.

नदीवर पूल, सरकारची नुसतीच हूल

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:21

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ही राज्याची शान आहे. मात्र ज्या खालापूर तालुक्यातून हा एक्सप्रेस वे गेलाय त्याच गावांमधले नागरिक अक्षरशः तारेवरची कसरत करत नदी ओलांडतात. वर्षानुवर्षे कैफियत मांडूनही पूल बांधला जात नसल्यानं सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय.

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 09:30

25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.

'थंड' माथेरान नामांतराच्या वादामुळे झालं 'गरम'

Last Updated: Monday, July 9, 2012, 08:35

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणा-या माथेरानमध्ये सध्या नामांतराचा प्रश्न जोरात गाजतोय. रेल्वे स्थानकाला आदमजी पीर भॉय यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून कोणत्याही परिस्थितीत माथेरान हे नाव बदलू नये यासाठी माथेरानकर पुढं सरसावलेत.

कोट्यवधी रुपयांच्या डाळींचा साठा जप्त

Last Updated: Sunday, July 8, 2012, 13:40

पनवेल इथल्या अजवली गावात असलेल्या सोहनलाल कमुनीटी मॅनेजर या कंपनीच्या गोडाऊन मध्ये राज्य दक्षता पथक आणि जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांनी शनिवारी धाड टाकून १७ हजार क्विंटल तुरडाळ आणि मुगडाळ साठा जप्त केला.

काँग्रेसला दणका, ठाण्याचे विरोधी नेतेपद रद्द

Last Updated: Friday, July 6, 2012, 20:14

ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.

मांडूळांची तस्करी पडली भारी...

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:03

ठाण्यात गुन्हे शाखेनं काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय. त्याच्याकडून सुमारे साठ लाख किमतीचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आलेत.

124 कोटींचा बेकायदेशीर धान्यसाठा जप्त

Last Updated: Friday, July 6, 2012, 13:12

उरणजवळच्या चिरनेरमधील खारपाटील गोडाऊनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागनं गुरुवारी धाड टाकली. यामध्ये बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला सुमारे 124 कोटी 35 लाख रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त करण्यात आलाय.

'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात

Last Updated: Friday, July 6, 2012, 13:42

घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...

नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 15:45

‘स्वाईन फ्लू’नं मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.