पावसाचा हाहाकार, रस्त्याला ४० फूट खोल खड्डा

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 20:11

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीकडून भूईबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणा-या मार्गात 15 मीटर रस्ता खचलाय. हा रस्ता 40 फूट खचला आहे.

डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:37

कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी मोठ्या फरकांनी भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर यांना पराभूत केले. युतीची गेल्या वीस वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढली आहे.

सेनेला दे धक्का, कपिल पाटीलांचा विजय झाला पक्का

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:27

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे. कपिल पाटील यांचा मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विजय झाला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनिषा कायंदेचा त्यांनी पराभव केला आहे.

मतमोजणी सुरू, डावखरेंच्या मुलाचं काय होणार?

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:26

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

विधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 07:49

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे... मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झालं.

पत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 11:03

संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पाईपलाईनसाठी १०० कोटींचे रस्ते खोदले

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 09:58

उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. ठेकेदाराने ही पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील सुमारे १०० कोटींचे सिमेंटचे रस्ते खोदले असल्याचे उघडकीस आलंय.

कोकण पदवीधरमध्ये तिरंगी लढत

Last Updated: Sunday, July 1, 2012, 16:29

कोकण पदवीधर निवडणुकीचं केंद्र आता ठाणे शहर बनलय. भाजपचे संजय केळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे अशी ही लढत अपेक्षित होती.. मात्र राष्ट्रवादीच्या नीलेश चव्हाण यांची बंडखोरी आणि त्यांना मनसेनं दिलेला पाठिंबा, यामुळं आता ही लढत तिरंगी ठरणार आहे.

शिष्यवृत्ती रक्कम अधिका-यांनी केली हडप

Last Updated: Sunday, July 1, 2012, 11:07

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिका-यांनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल २५ लाखांच्या घरात आहे.

मुलींना मारहाण करणाऱ्या महिलेस अटक

Last Updated: Saturday, June 30, 2012, 22:14

नालासोपा-यामध्ये मुलांना मारहाण करणा-या हंसा मेहता या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिनं आठ वर्षांच्या अश्विनी सिंग आणि तीन वर्षाच्या टक्की हिला मारहाण केली आहे.