वाळूमाफियांचा तहसिलदारांवर हल्ला

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 13:57

राज्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरुच आहे. वाळूमाफियांनी तहसिलदारांवर हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. चिपळूणच्या तहसिलदार जयमाला मुरुडकर यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडला.

ठाण्यात 'काँटे की टक्कर'!

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 08:18

ठाण्यात पदवीधर मंतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. विजय आमचाच होईल, असे दावे युती आणि आघाडीनं केलेत. पण आघाडी आणि युतीमधली अंतर्गत आव्हानं लक्षात घेता, ही निवडणूक कुणासाठीही नक्कीच सोपी नाही.

'दस नंबरी' बाप बेटे गजाआड...

Last Updated: Monday, May 21, 2012, 11:31

बनावट एन. ए. ऑर्डर आणि शासकीय दस्तावेज तयार करुन नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणारी टोळी उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या टोळीतील एका बिल्डर बाप-बेट्यासह चार जणांना अटक झाली आहे. या भामट्यांनी सुमारे 30 ते 40 अनधिकृत इमारती बांधून सदनिकांची विक्री केल्याचं उघड झालंय.

पाणी भरताना मुलगी पडली विहिरीत

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:35

मोखाडा तालुक्यात टँकरच्या पाण्यासाठी झुंबड उडालेली असताना एक मुलगी तोल जाऊन विहिरीत पडली आणि गंभीर जखमी झालीय.

२२ वर्षाने साहित्य संमेलन भरणार कोकणात

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:28

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१३ मध्ये चिपळूणला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ८६ व्या अ भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कराड, यवतमाळ आणि चिपळूण या तीन ठिकणाहून निमंत्रण आली होती.

शिक्षकांनीच केली शाळेची तोडफोड

Last Updated: Saturday, May 19, 2012, 23:44

नोकरीच्या आशेने आलेल्या ५००च्या वर उमेदवारांनी केली मुलाखतीच्या ठिकाणी तोडफोड केली. कल्याणमधील कर्णिक रोड परिसरात ही घटना घडली. वृत्तपत्रातली नोकरी संदर्भातील जाहिरात पाहून मुलाखतीसाठी ५५० च्या वर तरुण आले होते.

ICSE परिक्षा, ठाण्याची शलाका देशात पहिली

Last Updated: Saturday, May 19, 2012, 18:03

आयसीएसई आणि आयएससी बोर्डानं आज आपले १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर केले. या परिक्षेत ठाण्याच्या शलाका कुलकर्णी आणि धनबादच्या माधवी सींगनं १० वीच्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला.

मालमत्ता करप्रणाली चुकीची घटनाविरोधी?

Last Updated: Friday, May 18, 2012, 22:30

मुंबई आणि ठाणे महापालिकेनं भांडवली मुल्यावर आधारीत लागू करण्यात येणाऱ्या मालमत्ता करप्रणाली विरोधात धर्मराज्य पक्षाचे सचिव राजेंद्र फणसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर १४ जूनला सुनावणी होणार आहे.

चोर तो चोर वर शिरजोर...

Last Updated: Friday, May 18, 2012, 21:33

भिवंडीत वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये दारु प्यायलेल्या तीन युवकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या सुभाष चौकात ही घटना घडली.

'श्रीष' चौकशीच्या फेऱ्यात...

Last Updated: Friday, May 18, 2012, 19:09

ठाण्यातील ‘श्रीष’ गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय.