शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात

Last Updated: Saturday, June 2, 2012, 09:09

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 338वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथी नुसार आज मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. देशाच्या कानाकोप-यातून हजारो शिवभक्तांनी किल्ले रायगडावरगर्दी केली आहे.

कोकण रेल्वेचे पावसाळ्यापूर्वी अडथळे दूर

Last Updated: Friday, June 1, 2012, 20:15

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलीय. गतवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरलेल्या पोमेंडी रेल्वे मार्गावरील अजस्त्र डोंगर हटवण्याचे काम जवळपास पूर्ण झालंय. तरीही रेल्वेमार्गाला असलेला धोका कायम आहे.

'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग

Last Updated: Friday, June 1, 2012, 16:51

भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.

सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

Last Updated: Friday, June 1, 2012, 10:54

सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.

ठाण्यात महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलची तोडफोड

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 16:42

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.

ठाण्याचं कामगार हॉस्पिटल 'आजारी'

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 21:21

ठाण्यातल्या कामगार हॉस्पिटलची अशरक्षः दूरवस्था झाली आहे. कामगारांसाठीचं एकमेव हॉस्पिटल असूनही प्राथमिक सुविधांचाही याठिकाणी अभाव आहे. पेशंट्सना निकृष्ट दर्जाच्या जेवणासोबतच अनेक प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय.

मुंबईतील वऱ्हाडाच्या बसला अपघात, २७ ठार

Last Updated: Monday, May 28, 2012, 12:39

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात २३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. खालापूर जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाड असलेल्या दोन मिनी बसना मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.

वसईत भीषण अपघात, ३ ठार

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:08

वसईत ट्रक आणि इंडिका कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. वसईच्या सातिवली खिंडीत बाफणा परिसरातून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला.

ठाण्याच्या वाहतुकीचा मार्ग बदलला

Last Updated: Saturday, May 26, 2012, 12:09

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता ठाण्यातील नौपाडा वाहतूक शाखेच्या वतीनं रोटरी पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र ठाणेकरांनी या पर्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

अंबरनाथमध्ये अपघात, १ ठार २४ जखमी

Last Updated: Thursday, May 24, 2012, 22:36

अंबरनाथमधील आंनदनगर भागात कुल कॅब कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत कारचालक जागीच ठार झाला तर बस मधील २४ प्रवासी जखमी झाले आहेत.