नागपूरचा पारा @ 46.6

Last Updated: Thursday, May 31, 2012, 11:14

वाढत्या तापमानामुळे दिवसा होरपळण्याची पाळी नागपूरकरांवर आली असताना आता संध्याकाळी देखील उकाड्यानं नागपूरकर हैराण झालेत.बुधवारी नागपूरचं तापमान 46.6 डिग्री सेल्सियस होते.

नागपूरमध्ये करिअर कार्निव्हल

Last Updated: Thursday, May 31, 2012, 11:02

नागपूरमध्ये 1 ते 3 जून दरम्यान करिअर कार्निव्हलचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये मोठ्या संख्येनं विविध शाखांचे आणि विविध शहरांतून सहभागी होणार आहेत.

ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 21:45

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

राष्ट्रवादीने नाक खुपसू- मनसे

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 17:20

मनसेनं कुणासोबत युती करावी हे राष्ट्रवादी नेत्यांनी सांगू नये अशा शब्दांत मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत मनसेनं शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकली होती.

राज - पतंगराव येणार आमनेसामने...

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 13:47

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज नागपूरला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 08:59

गडचिरोलीत तब्बल दीड महिन्यांपासून सुरू असलेला नक्षलवाद्यांचा हैदोस वाढतच चाललाय.अहेरी तालुक्यातील अतीदुर्गम येरमनार इथं सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचं बांधकाम प्रगतीपथावर सुरू असताना, इमारतीच्या बांधकाम साहित्याची मोठ्याप्रमाणात नासधूस केली.

विधापरिषदेचे निकाल जाहीर, दिग्गजांचा विजय

Last Updated: Monday, May 28, 2012, 11:21

विधान परिषद निवडणुकीच्या सहा जागांचे निकाल लागले आहेत. चंद्रपूरची जागा काँग्रेसकडून भाजपनं खेचून आणली आहे. भाजपचे मितेश भांगडिया यांनी काँग्रेसच्या संजय पुगलियांचा पराभव केला आहे.

गडकरींच्या वाढदिवसासाठी ५५ किलोचा केक

Last Updated: Sunday, May 27, 2012, 16:24

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा ५५ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.

१२वीच्या परीक्षेत अंपंगाची गगनभरारी

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:37

मनात काही करून दाखवण्याची जिद्द असली तर काहीच अशक्य नाही असं म्हणतात. हेच करून दाखवलं आहे नागपूरातल्या बारावीच्या दोन अपंग विद्यार्थ्यांनी. राहुल बजाज आणि प्रिती बरडे या दोन विद्यार्थ़्यांनी अपंगात्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे.

नक्षल्यांचा फतवा, लोकप्रतिनिधींना हटवा

Last Updated: Saturday, May 26, 2012, 11:30

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हत्या आणि इतर जाळपोळीच्या घटनाचे सत्र सुरूच ठेवले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यासाठी दबावाचं धोरण अवंबलंय. आता तर नक्षल्यांनी आणखी आक्रमक होत 'राजीनामे द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा' अशी धमकीच लोकप्रतिनिधींना दिलीय.