हेडफोन लावून गाणी ऐकाल तर 'जीव गमवाल'

Last Updated: Monday, June 25, 2012, 23:02

मोबाईल वर गाणी ऐकणे चंद्रपूरच्या एका युवकाला चांगलेच महागात पडले. एका चुकीने त्याला जीव गमवावा लागला. चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने जाताना एक छोटे रेल्वे स्थानक आहे विवेकानंदनगर.

योजनेचे पैसे गेले बुडाले 'विहिरी'त!

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:44

शेतक-यांचा उत्कर्ष व्हावा या उद्दात हेतूनं सरकारकडून अनेक योजना अंमलात आणल्या जातात. परंतु सरकारी बाबूंच्या खाबुगिरीमुळं या योजनांचा कसा बट्टयाबोळ होतो. याचं उदाहरण गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात दिसून आलं.

चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:27

चंद्रपूरच्या जंगलात वाघांपाठोपाठ आता चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील जुनोना भागातून पोलिसांनी चितळ्यांची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून चितळ्याचे ताजे कातडेही जप्त केले आहे.

सेना-काँग्रेस 'मैत्रीत', भाजप सापडलं 'कात्रीत'?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 15:49

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं या दोन पक्षांतल्या मैत्रीचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे.... पाच वर्षांपूर्वी एनडीएच्या उमेदवाराविरोधात जाऊन शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता.

बसपा कार्यकर्त्यांचा राडा

Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:27

चंद्रपूर येथे आयोजित बसपा कार्यकर्त्यांच्या सभेत आज तुंबळ युद्ध झाले. या सभेत जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीविरूध्द नाराज कार्यकर्त्यांनी बसपा प्रदेश अध्यक्ष विलास गरुड आणि अन्य नेत्यांना बेदम मारहाण केली. अखेर पोलीस संरक्षणात या सर्व नेत्यांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले.

नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आता दररोज

Last Updated: Sunday, June 17, 2012, 10:54

आठवडय़ातून तीनवेळा धावणारी ही गाडी रविवारपासून नागपूरहून दररोज धावणार आहे. केवळ ११ तासांत नागपूर- मुंबई प्रवास पूर्ण करणारी दुरांतो एक्स्प्रेस आजपासून आठवडय़ातील सातही दिवस धावणार आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

नागपूरमध्ये मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:44

नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येतोय. तब्बल २८ तासांच्या या मेगाब्लॉकला आज दुपारी १२.०० वाजता सुरुवात होणार आहे.

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

Last Updated: Sunday, June 10, 2012, 11:58

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.

'तेंडुलकर ते सेंच्युरीकर'

Last Updated: Saturday, June 9, 2012, 10:34

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नागपुरात पार पडला. या सोहळ्याला क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी तसच सचिनचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.