पेट्रोल १ तर डिझेल ३ रू. स्वस्त होणार

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 14:08

नागपूरात डिझेल आणि पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या महासभेत पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार कमी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सादर केला.

विदर्भात १३२ औष्णिक वीज प्रकल्प

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 09:56

विदर्भात राज्य सरकार 132 नव्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करत आहे. परंतु या प्रकल्पामुळं विदर्भात प्रदूषण वाढणार असल्यानं सरकारच्या या धोरणाला विरोध वाढू लागलाय

माणिकरावांचं सूडाचं राजकारण?

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 10:28

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. माणिकरावांनी सुडाचं राजकारण केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे.

कोळसा खाणीत कामगाराचा करुण अंत

Last Updated: Saturday, June 2, 2012, 08:16

चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत झालेल्या एका भीषण अपघातात एका कोळसा कामगाराचा करुण अंत झाला. अशोक कांबळे असं या कामगाराचं नाव असून तो कोळसा उत्खनन करणा-या पोकलेन या अवाढव्य मशीनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

अडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:48

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.

१४ गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:55

मेळघाट, नंदूरबार किंवा ठाणे या जिल्ह्यातच नव्हे तर आता पश्चिम विदर्भातही कुपोषणाची समस्या तीव्र होत चाललीय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्य़ा १४गावांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर झालाय.

शिकाऱ्यांना गोळी घाला, पाच लाख मिळवा - राज

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:05

वाघ वाचवण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकर घेतलाय. ताडोबाचा दौरा करुन परतलेल्या राज यांनी वाघांच्या शिका-यांवरच निशाणा साधला. शिका-यांची शिकार करणा-या अधिका-यांना मनसेतर्फे पाच लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.

'खळ्ळ् खटॅक'ला राज ठाकरेंचा विरोध

Last Updated: Thursday, May 31, 2012, 20:45

पेट्रोल दरवाढी विरोधात आपल्याकडे बंद होतो मात्र वाघ मृत्यू पाडत आहेत त्यासाठी बंद होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. वाघ शिकार पाहणी दौ-यातून कोणताही राजकीय लाभ घ्यायचा नसून आस्था म्हणून इकडे आलो असल्याचे राज म्हणाले.

राज ठाकरेंच्या स्वागताला भाजप पदाधिकारी

Last Updated: Thursday, May 31, 2012, 13:00

चंद्रपुरातील ताडोबा दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चक्क चंद्रपूरचे भाजप पदाधिकारी पोचले. आपल्या चंद्रपूर दौ-यात राज नागपूरहून थेट दाखल झाले ते ताडोबा जंगलात.

अकोल्यात मुख्यमंत्र्यांची गाडी रोखली

Last Updated: Thursday, May 31, 2012, 12:41

अकोल्यात आज मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषदेच्या समारोपाला आले होते.