धाडसी तलाठ्यानं उघड केला कोट्यवधींचा घोटाळा

Last Updated: Saturday, July 7, 2012, 19:10

शासनाचा महसूल वाचविण्यासाठी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एका तलाठ्यानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांचीच तक्रार महसूलमंत्री आणि मुख्य सचिवांना केलीय. शासनाचा पगार घेऊन खाजगी कंपन्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या पगारातून बुडालेला महसूल वसूल करावा, अशी मागणीही या तलाठ्यानं केलीय.

न्यायालयाच्या परिसरातच साक्षीदारांवर हल्ला

Last Updated: Thursday, July 5, 2012, 17:16

गुरुवारी सकाळी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतच 25 ते 30 जणांच्या जमावानं चार साक्षीदारांवर हल्ला झालाय. या साक्षीदारांना जमावानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार घडला.

विदर्भाला 500 कोटींचं अनुदान

Last Updated: Thursday, July 5, 2012, 13:26

शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.

तर उपमुख्यमंत्रीपद हवे - आठवले

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:52

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आणि सत्तेत 20 टक्के वाटा द्यावा अशी मागणी रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलीय. काँग्रेसबरोबर असणारी दलित मते भाजप-शिवसेनेला मिळतील असा दावा आठवलेंनी यवतमाळमध्ये केलाय.

मैत्रीचा फायदा घेऊन दोघींवर बलात्कार

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:47

नागपुरात मैत्रीचा फायदा घेत पाच नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीए. आरोपींपैकी एकजण पीडित मुलीचा मित्र असल्यामुळे त्याला भेटण्यासाठी दोघीही गेल्या होत्या.

आदिवासी गावात ज्ञानगंगा...

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:14

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.

मुलीची हत्या करून मातेनं केली आत्महत्या

Last Updated: Friday, June 29, 2012, 09:03

नागपुरात आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्यावर कोयत्यानं वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आईनं आत्महत्या केलीय.

मिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव

Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:54

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

राज ठाकरेंची लग्नाची 'वारी' गडकरींच्या 'गढीवरी'

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:21

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन नागपूरच्या एंप्रेस सिटीमधील आयटी हॉलमध्ये भव्य स्वरुपात करण्यात आला. सारंग गडकरी आणि मधुरा रोडी यांचा २४ जूनला विवाह झाला होता.

भाजपचा राडा, तोडफोड... पोलिसांचा लाठीहल्ला

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:43

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. WCL कंपनीच्या कार्यालयाच्या या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आहेत. भाजप WCLच्या विरोधात आहे. चंद्रपुरात खाणी असलेल्या गावांमध्ये WCLनं विकासासाठी पैसे देण्याची गरज आहे.