अण्णांवरील हल्ल्याचे राऊतांकडून समर्थन!

Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:49

नागपुरात अण्णांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. यात अण्णा हजारे विरुद्ध नितीन राऊत असा नवा संघर्ष पेटलाय. काल रात्री जेव्हा ताफ्यातल्या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत त्याठिकाणी उपस्थित होते.

नक्षली बंद : गडचिरोलीत वाहतूक ठप्प

Last Updated: Thursday, May 17, 2012, 14:03

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंद दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम भागात वाहतूक ठप्प होती. बाजारपेठही बंद होती. नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर टाकण्यात आली आहेत.

पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:24

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

अण्णा हजारेंच्या गाडीवर नागपुरात हल्ला

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 19:57

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर आज काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अण्णा सुरक्षित असून हा हल्ला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प बोंबलला

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:56

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प २४ वर्षानंतरही रेंगाळलेला आहे. मोठा गाजावाजा करत काम सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाचा खर्चही आता ३६ पटींने वाढलाय. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होत आहे.

नागपूर अपघातात ५ ठार, १० जखमी

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:38

जळगावजवळ सूरत-नागपूर महामार्गावर पिकअप व्हॅन आणि ट्रकमध्ये अपघात झालाय. त्यामध्ये ५ जण ठार तर १० जण जखमी झालेत. ठार झालेले सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या आहेत. ते पिकअप व्हॅनमधून नाशिकला लग्नाला जात होते.

मोठ्या घातपाताचा कट उधळला

Last Updated: Monday, May 14, 2012, 12:39

गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे. जिल्ह्यातल्या दमदीटोला गावाच्या सीमेजवळ भू-सुरूंग पेरण्यात आले होते.

नुसत्याच बैठका आणि चर्चा... पाण्याचं काय?

Last Updated: Sunday, May 13, 2012, 18:23

धुळ्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडीत नागरिकांची पाण्यासाठी पायपीट आता नित्याचीच झालीय. गेल्या साठ वर्षांपासूनच हे चित्र अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहे.

शेतकऱ्यांसाठी धावला अमिताभ

Last Updated: Sunday, May 13, 2012, 16:25

सामाजिक जाण असलेल्या सेलिब्रिटी व्यक्ती तशा जरा दुर्मिळच... आपला बीग बी अमिताभ बच्चन त्यापैकीच एक... स्टारडममुळे आपल्यातील संवेदनशीलता जराही कमी झालेली नाही, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.

अण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल

Last Updated: Friday, May 11, 2012, 18:38

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.