दुषित दूध देतेय हृदय रोगाला निमंत्रण

Last Updated: Friday, May 11, 2012, 17:10

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉजीनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र यामुळे दुधाचं सेवन करणा-यांच्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

पोलिसांमुळेच तिघांना दगडाने ठेचून मारलं

Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:48

नागपूर शहरातल्या भारतनगरमध्ये काल दगडानं ठेचून संतप्त जमावानं तिघा जणांचा जीव घेतला होता. यासंबंधी धक्कादायक खुलासा स्थानिकांनी केला आहे.

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:21

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

नक्षलवाद्यांनी केलं सरपंचाचं अपहरण

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 19:45

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून त्यांचा तपास लागलेला नाही.

भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 19:24

महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय.

चोरटे समजून तिघांची केली हत्या

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:20

नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.

नागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 12:49

नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि बेवारस प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे तिथं मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या क्षेत्रातल्या जाणकारांनी हा अतिशय घातक प्रकार असल्याचे म्हटले आहे.

गडचिरोली : भाजीविक्रेतीवर बलात्कार- हत्या

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:41

गडचिरोली जिल्ह्यात एका भाजीविक्रेत्या महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर महिलेचे नराधमांनी डोळे फोडले आणि महिलेचे शव जंगलातच टाकून पळ काढला.

विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

Last Updated: Monday, May 7, 2012, 20:41

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

दारूड्या पोलिसाचा गोळीबार, एक ठार

Last Updated: Monday, May 7, 2012, 12:46

अमरावतीत एका दारुड्या पोलिसांनं गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या परतवाडा पोलीस ठाण्यात ही घटना घ़डली आहे. रामेश्वर धाकुडे अस ं या पोलिसाचं नाव आहे.