पवन पवार यांना न्यायालयीन कोठडी

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 21:04

नाशिकरोड प्रभाग सभापती पवन पवार यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अपक्ष नगरसेवक आणि सभापती पवार यांच्यासह पाच जनावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 00:17

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.

चाळीसगाव उपनगराध्यक्षपदी प्रदीप निकम यांची निवड

Last Updated: Monday, February 25, 2013, 18:54

चाळीसगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत प्रदीप निकम यांना सर्व नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राज ठाकरेंची आज सोलापुरात जाहीर सभा...

Last Updated: Friday, February 22, 2013, 09:46

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूरात असतील. सोलापूरमध्ये आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. कोल्हापूर, खेडनंतर राज ठाकरे सोलापुरात काय बोलणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय.

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:30

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

मुलीचे अश्लील फोटो काढून धमकावणाऱ्याला अटक

Last Updated: Thursday, February 21, 2013, 15:51

पत्रकारितेला काळीमा फासत एका मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:40

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.

नाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 18:20

नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.

नाशिकमध्ये मनसेची वर्षपूर्ती, पण स्वप्नपूर्ती कधी?

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:59

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

सुलाची नवी वाईन!

Last Updated: Sunday, February 17, 2013, 22:28

वाईनच्या वेगवेगळ्या चवी देण्याची परंपरा नाशिकच्या वाईन कॅपिटल ऑफ इंडियानं कायम राखली आहे. देशात पहिल्यांदाच रेड वाईन प्रकारातील वाईन माईल्ड शॅम्पेन लाँच करून वाईन रसिकांना एक नवीन व्हरायटी पेश केली आहे.