गायींची होतेय कत्तल, सुटका केलीच पाहिजे

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 16:40

नाशिक, गुजरातमधून कत्तलीसाठी नाशिकमध्ये आणलेल्या १७ गायींची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. यात आठ गायींचा समावेश आहे. एका गायीच्या वैद्यकीय तपासणीनंतर कृषी गो-सेवा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.

बिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन

Last Updated: Saturday, June 30, 2012, 19:47

मानवी वस्तीत शिरणा-या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वनविभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी वनविभागासाठी आव्हान ठरत आहे.

पाणीटंचाईच्या झळा उद्योजकांनाही

Last Updated: Friday, June 29, 2012, 22:23

सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

महिलेची लूट करून तिघांनी केला बलात्कार

Last Updated: Thursday, June 28, 2012, 23:28

नाशिक जिल्ह्यातील पाढूर्ली गावाजवळ तीन जणांनी एका महिलेची लूट करत तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

महिन्याभराच्या मुलीला आईने जाळून मारले

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 22:11

पती-पत्नीच्या भांडणात आईनं आपल्या पोटच्या मुलीलाच निर्दयीपणे ठार केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या तांदळवाडीत घडली आहे. रागाच्या भरात आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव घेतला आहे.

पोलिसांकडून आरोपीची आलिशान हॉटेलमध्ये बडदास्त

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:25

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची चक्क पोलिसांनीच एका आलिशान हॉटेलमध्ये सरबराई केल्याची घटना उघडकीस आली.

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 10:44

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

आक्रोश ब्रम्हगिरीचा!!!

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 00:01

नाशिककरांसाठी एक धोक्याची बातमी.... लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झालीयत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय.

कॉलेजला ठोकलं टाळं, विद्यार्थ्यांचं कसं होणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012, 22:05

जळगाव जिल्ह्यातल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या तीन कॉलेजेसना सील ठोकून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानं शिक्षण सम्राटांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

'ब्रह्मगिरी'चं अस्तित्व धोक्यात!

Last Updated: Friday, June 22, 2012, 09:03

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झाली आहेत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय, हे तर उघडउघड सत्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत.