भुजबळांचं बळ होतंय कमी

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 20:28

विधानपरिषदेचा आखाडा हा त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या संपर्काची आणि वर्चस्वाची सत्वपरीक्षा असते. पण नाशिकमधला विधानपरिषदेचा निकाल पाहता, आता नाशिकचे वारे भुजबळ म्हणतील त्या दिशेला वाहत नाहीत, हे स्पष्ट झालंय.

तापी घोटळ्यात सुरेश बोरोलेंना अटक

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 18:38

जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार केल्याचा आरोप बोरोले यांच्याविरोधात आहे

नाशकात चिठ्ठीची कमाल, राष्ट्रवादीला लॉटरी

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 08:26

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाचा निकाल अखेर नाट्यमय पद्धतीनं लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणेंचा चिठ्ठी पद्धतीनं पराभव केला. जयंत जाधवांना नशीबानं साथ दिल्यानं जास्त मतांची जमवाजमव करूनही शिवसेनेच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

नाशिकच्या आमदारकीचं होणार तरी काय?

Last Updated: Monday, May 28, 2012, 16:21

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाच्या निकालाबाबतचा पेच कायम आहेत. पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली.

नाशिकमध्ये फेरमतमोजणीनंतरही पेच कायम

Last Updated: Monday, May 28, 2012, 13:35

नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळं फेरमतमोजणी करण्यात येत आहे.

जळगावमध्ये रेलरोको... प्रवाशांचे हाल

Last Updated: Sunday, May 27, 2012, 15:22

जळगाव-आसोदा रेल्वे स्टेशन दरम्यान कोळी महासंघाच्या आंदोलकांनी रेलरोको केला होता. त्यामुळं मुंबईकडे येणारी काशी एक्स्प्रेस भुसावळला थांबवण्यात आली होती. तर इतर दोन मालगाड्याही आंदोलकांनी अडवून धरल्या होत्या.

नाशकात लाचखोर सहनिबंधकाला अटक

Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:29

नाशिकमध्ये एका उच्चपदस्थ अधिका-याला आज अटक करण्यात आली. एस.के. शेडपुरे असं या अधिका-याचं नाव आहे. सहकार विभागातील सहनिबंधक पदावर असलेल्या या अधिका-याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे.

कांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा

Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:54

नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शिवसेना-भुजबळ सामन्यात मनसेची भूमिका काय?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 08:40

नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.

दुष्काळ आहे... दुष्काळ नाही...!

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 15:42

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाय. सरकारी अधिका-यांनी मात्र दुष्काळ नसल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळं अनेक गावं सरकारी मदतीपासून वंचित आहेत. गावक-यांवर क्षारयुक्त पाणी पिऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे.