कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

Last Updated: Monday, June 4, 2012, 22:32

..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

विवाहाचे गिफ्ट; उपेक्षितांच्या मदतीसाठी

Last Updated: Monday, June 4, 2012, 16:04

जळगाव जिल्ह्यात सात जन्माचे फेरे घेणाऱ्या अर्चना सावंत आणि अभिजित शिंपी या नवदाम्पत्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. स्वत:च्या लग्नाचे गिफ्ट उपेक्षितांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. समाजसेवी संस्थांना सुमारे एक लाख रूपयांची देणगी देऊन नवा पायंडा पाडला.

निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज प्रस्थान

Last Updated: Saturday, June 9, 2012, 22:48

वारी म्हटली की, देहू, आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जाणा-या पालखी सोहळ्यांचीच चर्चा होते. मात्र ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि गुरू यांच्या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळेच झी 24 तासनं वारीच्या उगमस्थानाकडे दर्शकांचं लक्ष वेधलंय.

आता देऊळही बदलतयं...

Last Updated: Sunday, June 3, 2012, 21:23

मंदिरांची नगरी अशी नाशिकची ओळख. आता नाशिकमधली मंदिरं नव्या रुपात समोर येणार आहेत. मंदिरांचा पारंपारिक ढाचा बदलत मंदिरंही आता आधुनिक होत आहेत.

पोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून

Last Updated: Sunday, June 3, 2012, 21:13

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये केरोसिन ओतून जाळून घेण्याचा एका महिलेने प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. रत्ना शेजवळ नावाच्या या महिलेनं पोलीस स्टेशनच्या आवारातून जाळून घेत थेट स्टेशनमध्ये धाव घेतली.

परेराला तुरुंगात शाही वागणूक; चौकशी सुरू

Last Updated: Sunday, June 3, 2012, 15:50

‘हिट एन्ड रन’ प्रकरणात नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एलिस्टर परेरा या गुन्हेगाराला तुरुंगातच शाही वागणूक मिळत असल्याचं वृत्त ‘झी 24 तास’नं प्रसारीत केल्यानंतर तुरुंग प्रशासन खडबडून जागं झालयं. एलिस्टर परेराच्या शाही वागणुकीची डीआयजी स्तरावर चौकशी सुरु झालीये.

दुषित गोदावरी, प्रशासन आधांतरी

Last Updated: Saturday, June 2, 2012, 17:53

गोदावरीच्या पाणवेलींचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. महापौरांनी पहाणी दौरा केला. स्थायी समिती सभापतींनी पाणवेली काढण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्री छगन भूजबळ यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. एवढं होऊनही प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही.

नाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त

Last Updated: Saturday, June 2, 2012, 09:55

मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नाशिकमध्ये रिक्षाचालकांची अघोषित दरवाढ

Last Updated: Friday, June 1, 2012, 23:15

पेट्रोल दरवाढीनंतर रिक्षाचालकांनी अघोषीत दरवाढ केली आहे. त्रासलेल्या प्रवाशांनी याप्रकरणी आरटीओकडे तक्रार केलीये. तक्रारीवरुन २० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आलीये.

पोलीस 'निवडणुकीची' चेष्टा

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 22:37

पोलीस दलात निवड झाल्यानं देशाची सेवा करायला सज्ज असतानाच निवड रद्द झाल्याची चिठ्ठी हातात पडते. नाशिकमधल्या काही विद्यार्थिनींच्या बाबतीत असंच घडलंय. विशेष म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्याकडून काम करुन घेतल्यावर त्यांना त्यांची निवड रद्द झाल्याचं कळवण्यात आलंय.