मनसे युतीला मदत करणार?

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 14:49

नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत.

राजकारणीच विकतायेत साखर कारखाने- अण्णा

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:13

राज्यातील १८ सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राजकारण्यांनी तेच कारखाने कवडीमोल भावात खरेदी केले असा आरोप करत अण्णा हजारे यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाठील यांच्यावर जळगावात निशाणा साधला.

फी वाढवणारच, शाळेची मनमानी

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:01

नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला.

प्रतिक्षा नाशिक - मुंबई मालवाहू ट्रेनची

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:01

मुंबईमध्ये भाजीपाला, फळे हा माल लवकरात लवकर आणि तेही स्वस्त दरात पोहचला जावा, यासाठी खास नाशिक – मुंबई - नाशिक अशा मालवाहू ट्रेनची योजना मध्य रेल्वे तयार करत आहे.

राज्यमंत्री देवकरांना जामिन मंजूर

Last Updated: Monday, May 21, 2012, 19:03

जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी

Last Updated: Sunday, May 20, 2012, 11:34

सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. याशिवाय प्रचंड गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडला आहे.

नाशिकचं 'झी २४ तास'संगे 'एक पाऊल पुढे'

Last Updated: Sunday, May 20, 2012, 10:01

नाशिक फर्स्ट समीटमध्ये कृषी, अन्न प्रक्रिया उद्योगाबरोबरच आयटी आणि गृहनिर्माण क्षेत्रातल्या जाणकारांनी शहराच्या प्रगतीचा आलेख मांडला. त्याच बरोबर भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा केली.

घरकुल घोटाळा २५ नगरसेवकांना कोठडी

Last Updated: Saturday, May 19, 2012, 20:21

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातल्या १५ आरोपींना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दहा आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

'नाशिक फर्स्ट'चं उद्योजकांनी केलं कौतुक

Last Updated: Saturday, May 19, 2012, 19:06

नाशिक शहराच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या 'झी २४ तास'च्या 'नाशिक फर्स्ट' समीटमध्ये आज दिग्गजांनी विकासाचा रोडमॅप मांडला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत उदघाटन झालेल्या या उपक्रमाचं स्थानिक उद्योजकांनी कौतुक केलं.

साईबाबांच्या मंदिरात सोन्याची घंटा

Last Updated: Saturday, May 19, 2012, 13:56

शिर्डीच्या साईबाबांना आज मुबई येथील मुकेश गुप्ता या साई भक्ताने ३५ लाखांची सोन्याची घंटा तसेच कैलास अग्रवाल या साईभक्ताने २६ लाख रूपयांच सोन्याची झारी अर्पण केली आहे. या एकत्रित सोन्याच्या वस्तूंच बाजारमूल्य ५६ लाख रुपये आहे.