दरोडा पडला... आमदारांच्याच घरी

Last Updated: Sunday, May 6, 2012, 17:30

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात भाजप आमदार उमाजी बोरसे यांच्या शेतातल्या घरावर सशस्त्र दरोडा पडला आहे. मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला.

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:07

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

जकात वसूलीवरुन नाशिक महापालिकेत खडाजंगी

Last Updated: Friday, May 4, 2012, 22:13

नाशिक महापालिकेत जाकातीवरून पुन्हा रणकंदन सुरु झालंय. महासभेनं पारित केलेला ठराव विखंडित करावा अशा आशयाचं पत्र स्थायी सामिती सभापतींनी आयुक्तांना दिलंय. जकातीची वसुली महापलिका प्रशासनानेचं करावी असा ठराव झालेला असतनाही पुन्हा खासगीकरणाकडे सदस्यांचा कल दिसतोय.

कर्बाईडवाल्या आंब्यांवर छापे

Last Updated: Friday, May 4, 2012, 20:46

नाशिक शहरात कार्बाईडचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने अन्न औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.या छाप्यांमध्ये विविध आंबे आणि रासायनिक पदार्थ सील करण्यात आले आहेत.

वाळू माफियांची तहसीलदारांना मारहाण

Last Updated: Friday, May 4, 2012, 15:30

राज्यात वाळू तस्करांचा उच्छाद सुरुच असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव येथील तहसीलदारांची गाडी जाळल्याची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे नायब तहसीलदार राहुल कोतांडें यांना वाळूची तस्करी करणाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

गाडी जाळली म्हणून कामबंद

Last Updated: Thursday, May 3, 2012, 11:54

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या उच्छादाचा निषेध म्हणून महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे. दुपारी ३ वाजता निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

वाळू माफियांनी तहसीलदाराची गाडी जाळली

Last Updated: Thursday, May 3, 2012, 11:04

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी रात्रीच्या सुमारास चाळीसगावच्या तहसीलदाराची गाडी जाळल्याची घटना घडली आहे. तहसीलदार गाडीत नसल्यानं बचावले असून गाडीचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.

फाळकेंच्या स्मारकासाठी वास्तूच नाही!

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 20:58

चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंच्या वास्तूचं स्मारक उभारण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण ही घोषणा आता घोषणाच राहण्याची शक्यता आहे. कारण नाशिक शहरात फाळकेंची अशी कुठलीही वास्तू शिल्लक नाही.

कांदा दराचे आंदोलन पोलिसांनी चिरडलं

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 09:59

महाराष्ट्र दिनाचा सगळीकडे जयजयकार होत असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं. पण कांद्याचं आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल, याचे संकेत या आंदोलनानं दिले.

नाशकात मॉलला आग, एकाचा मृत्यू

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 09:23

नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ साखला शॉपिंग मॉलला लागलेली भीषण आग विझवण्य़ात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत सुरक्षारक्षकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर शॉपिंग मॉलचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे.