पाण्यासाठी जीव गेला

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:22

राज्यात पाणी टंचाईनं आणखी एक जीव गेला आहे. नाशिक जिल्हात विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रखुबाई सोनावणे या पन्नास वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मालेगाव वळवाडे गावात ही घटना घ़डली.

शाळेतील गणवेश चोरांवर होणार कारवाई

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:50

जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या गणवेश घोटाळा प्रकरणातल्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतला आहे. हा गणवेश घोटाळा लाखो रुपयांचा आहे.

मुलगी नको... नदीमध्येच फेकून दिली

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:57

कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आणि अनेक सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत असले तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये नागझिरी नदी पात्रात सात महिन्यांच्या एका मुलीचं मृतावस्थेतील अर्भक सापडलं आहे.

नाशिक, नगरमध्ये अवकाळी पाऊस

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 10:00

नाशिक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला,मनमाड, नानाद्गाव आणि सिन्नर भागातील अनेक गावांमध्ये आज विजेच्या कडकडटासह पावसानं अर्धा तास वाहतूक जाम केली.

भर दिवसा ATM मशीनची तोडफोड

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 19:55

नाशिकमध्ये भर दुपारी स्टेट बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोडीची घटना घडलीय. सिडको परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेन्टरमध्ये ही घटना घडली आहे. मनीष पुरषोत्तम बोरस्कर हा वेट लिफ्टिंगच्या प्लेट घेवून आला. आणि त्यानं बँकेच्या आवारातीलचं एटीएम मशीनची तोडफोड केली.

नव्या प्रकल्पांचं उद्घाटन, जुन्यांकडे दुर्लक्ष

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:41

नियोजनाच्या आणि निधीच्या दुष्काळामुळं राज्यातले अनेक प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेत. सगळ्यांनाच खूश करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळं नव्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि जुन्या प्रकल्पांकडं दुर्लक्ष असा प्रकार सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाडळसरे प्रकल्पाचीही तीच गत झालीय

काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:47

धुळ्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मानापमान नाट्य रंगले. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

अधिकाऱ्यांना बंगल्याचा मोह काही सुटेना..

Last Updated: Monday, May 7, 2012, 11:37

सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.

शिर्डी रेल्वे प्रवाशांना चोरांमुळे मनस्ताप

Last Updated: Monday, May 7, 2012, 11:06

विद्युत वाहक तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या प्रतापामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नुकतीच घडली. दादरहून शिर्डी-साईनगर रेल्वे स्थानकावर पुणताम्बा नजीक हि घटना घडली.

वाळू माफियांचं काही खरं नाही

Last Updated: Monday, May 7, 2012, 08:16

जळगावात गिरणा नदीच्या पात्रात वाळू चोरी करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.