नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

नाशिकच्या महापौर निवडणुकीला स्थगिती ?

Last Updated: Friday, March 9, 2012, 08:19

नाशिकच्या महापौर निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीला स्थगिती मिळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

नाशकात शिवसेनेचे मनसेवर दबावतंत्र?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 23:00

नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेवर दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. हे दबावतंत्र आहे, महापौर निवडणुकीसाठी. नाशिकमध्ये मनसेने जास्त जागा पटकावून नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान पटकावले आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने सत्तेसाठी मनसेला कसरत करावी लागणार आहे. याच संधीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दबावतंत्रचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

विहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत

Last Updated: Thursday, March 8, 2012, 15:15

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

'डोलची'शिवाय नाही धुळ्यातली धुळवड

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:56

धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खानदेशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.

संपावर बस, पालक-विद्यार्थी 'बे'-बस

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:54

राज्यभरातील बस मालक ९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातल्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यात आहे. बस मालक संघटनेच्या सदस्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली.

बोगस व्होटिंग कार्ड प्रकरणी दोघांना अटक

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 09:28

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस व्होटिंग कार्ड प्रकरणी अखेर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने चौकशीचे पाऊल उचल्यानंतर सात दिवसांनी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बोगस मतदार कार्डांचा झाला पर्दाफाश

Last Updated: Monday, March 5, 2012, 22:56

महापालिका निवडणूकीतील बोगस ओळखपत्र तयार केल्याचा गौप्यस्फोट करणारा कन्हैया परदेशी उपविभागीय कार्यालयात स्व:ताहून हजर झाला. त्याची नाशिकचे उपविभागीय अधिकारी निलेश सागर यांच्या दालनात चौकशी झाली.

होळी कसे साजरी करतात आदिवासी

Last Updated: Monday, March 5, 2012, 21:29

होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याची जोरदार तयारी राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. जळगावातल्या सातपुड्यातल्या आदिवासी भागात सध्या भोंगऱ्या बाजार भरला आहे, तर खानदेशात होळीनिमित्त घालण्यात येणाऱ्या साखरेच्या दागिन्यांनी बाजार फुलले आहेत.

बिबट्याचा हल्ला बहिणीवर, भावाने घेतले जीवावर

Last Updated: Monday, March 5, 2012, 20:32

नरभक्षक बिबट्यानं पकडलेल्या १४ वर्षांच्या बहिणीची भावानं सुटका केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या तोंडापूर शिवारात घडली आहे. फरीदा खाँ शेतातून कापूस वेचून परत येत असताना तिच्यावर तोडापूर शिवारात बिबट्यानं हल्ला केला.