कांदा शेतकऱ्यांना रडवणार?

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:51

गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावलाय. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय.

नाशिकमध्ये आठवर्षीय बालिकेवर बलात्कार

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 14:59

नाशिकमध्ये गेले अनेक दिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गेल्या २४ तासात नाशिकमधील घटनांनी मानवतेला काळिमा फासलेला आहे, एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:13

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

आजचा दिवस अपघातांचा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:35

आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.

पोलिसांच्या होर्डिंगबाजीवर नाशिककरांची नाराजी

Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:34

निवडणुकांचा मौसम असल्यानं विविध पोस्टर्समुळे नाशिक बकाल झालं आहे. त्यातच आता भर टाकली आहे ती वाहतूक पोलिसांनी. त्यामुळे नाशिककर आणखी वैतागलेत. जुन्या गंगापूर परिसरात उभारण्यात आलेलं हे होर्डिंग सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे फोटो, त्यांच्यावर केलेली कारवाई यांची माहिती लावण्यात आली आहे. अशीच होर्डिंग्ज तीन ते चार ठिकाणी लावण्यात आली आहेत

छगन भुजबळ जाणार दिल्लीच्या राजकारणात

Last Updated: Thursday, December 29, 2011, 23:06

राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासोबतच येत्या मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे, आघाडी बाबतच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शिर्डी: व्हीआयपी दर्शनाला 'नो एन्ट्री'

Last Updated: Sunday, December 25, 2011, 09:59

नववर्षाची सुरवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी लाखो भाविकांची इच्छा असते त्यामुळेच नववर्षाच्या सुरवातीला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी तासंतास लाबंच लांब रांगा लावून दर्शन घेतात, त्यामुळे नववर्षानिमित्ता बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपींना प्रवेश बंद राहणार आहे.

नोकरी भरती परीक्षा विनासूचना रद्द!

Last Updated: Saturday, December 24, 2011, 20:38

कोणतीही पूर्वसुचना न देता नाशिक महापालिका प्रशासनानं नोकर भरतीची लेखी परीक्षा रद्द केली. त्यामुळं नाशिकमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या हजारो उमेदवारांचा भ्रमनिरास झाला.

मनसेच्या मिळून साऱ्याजणी प्रचारात

Last Updated: Saturday, December 24, 2011, 16:05

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आता पासूनच प्रचाराला सुरूवात झालीय. त्या वॉर्डातून मनसेच्या तिकीटासाठी सात महिला उमेदवार इच्छुक आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही. मात्र तिकीट वाटपाची वाट न पाहता त्या सातही इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराला सुरवात केलीय.

आता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 17:00

मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.