घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकरांची चौकशी

Last Updated: Thursday, February 2, 2012, 14:46

राज्य परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांची घरकुल घोटाळ्या प्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. घरकुल घोटाळा तब्बल २९ कोटी ५९ लाखांचा आहे.

नाशिकमध्ये सुहास कांदेवर तडीपारीची कारवाई

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:51

सुहास कांदेसह १२ जणांना नाशिक पोलिसांनी तडीपारीची नोटिस बजावली आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाईला सुरवात केली आहे.

नाशकात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:10

नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली. सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली.

जळगावात नगरसेवक, महापौरांवर गुन्हा दाखल

Last Updated: Monday, January 30, 2012, 17:49

जळगावातील घरकुल घोटाळ्यातल्या चौघा आरोपींना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्कालीन नगरपालिकेत शहरात नऊ ठिकाणी उभारलेल्या ११ हजार ४२४ घरकुलांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता.

नाशिकमध्ये इच्छुकांचा प्रचार सुरू

Last Updated: Saturday, January 28, 2012, 23:07

नाशिकमध्ये अजून कुठल्याच पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. तरीही विविध पक्षातल्या इच्छुकांनी तिकीट गृहीत धरुन प्रचार सुरू केला आहे. तर अनेकांनी तिकीट न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे.

नाशिकमध्ये महाआघाडी ?

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:52

नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.

मराठी माध्यमांच्या शाळांसाठी मानवी साखळी

Last Updated: Friday, January 27, 2012, 00:02

मराठी माध्यमांच्या शाळांच्या स्वातंत्र्याचे रक्षण सरकारने करावे यासाठी नाशिकमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यांत विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सहभागी झाले होते.

पाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत !

Last Updated: Thursday, January 26, 2012, 21:00

पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.

नाशिकमध्ये युतीला भगदाड

Last Updated: Thursday, January 26, 2012, 19:25

नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

जात पडताळणीसाठीसाठी ठिय्या आंदोलन

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 23:11

नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी जात पडताळणी मिळत नसल्यानं इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला पडताळणी बंधनकारक केल्यानं कार्यालयांमध्ये गर्दी झाली आहे.