थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 00:24

देवभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी नाशिक जिल्ह्याची ही ओळख साऱ्या जगानं मान्य केली आहे. महाराष्ट्राचे देवघर असं संतसाहित्यिकानी वर्णन केलेल्या नाशिकची ओळख आता बदलत आहे. देवभूमीत आता दानवांचा संचार झाला आहे आणि याच दानवाचे जे काही प्रताप आहेत ते पाहून कुणाचाही संताप होईल. ही कृष्णकृत्य आहेत नाशिकच्या नराधम गुन्हेगांराची.

नाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 16:36

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.

राळेगण ते झेडपी व्हाया राष्ट्रवादी

Last Updated: Monday, January 9, 2012, 14:49

राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मापारींना राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे.

नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

Last Updated: Monday, January 9, 2012, 13:06

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

शाळेतील घोटाळे संपता संपेना

Last Updated: Sunday, January 8, 2012, 17:37

शासकीय योजना आणि त्या योजनेत कुठलाही घोळ असणार नाही असं क्वचितच घडतं. राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जळगावमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपतानाही विद्यार्थी गणवेश वाटप सुरू असल्याचं उघड झालं आहे.

'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !

Last Updated: Friday, January 6, 2012, 21:23

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.

जळगावात डेंग्युची साथ

Last Updated: Friday, January 6, 2012, 20:48

जळगाव शहरामध्ये डेंग्युची साथ पसरलीये. डेंग्युमुळे रवींद्र घुगे या पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा वर्षाच्या सोहम सोनार या बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाचपुतेंनी केला आचारसंहितेचा भंग?

Last Updated: Friday, January 6, 2012, 17:08

आचारसंहिता आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच री ओढली.

नाशिक वाहतूक पोलिसांची बसचालकांवर कारवाई

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:15

नाशिक वाहतूक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत वाहनचालकांचं प्रबोधन करण्यात येत आहे.