नाशिकमध्ये अण्णांच्या स्वयंसेवकांचं प्रबोधन

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 22:30

अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काही ठिकाणी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तर नाशकात त्यांनी प्रबोधन आणि प्रचाराचं काम हाती घेतलं आहे.

अण्णांचा सल्ला, भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा!

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:33

प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराची किड वाढत आहे. हा भ्रष्टाचार पाहून लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे. त्यामुळे भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा, असा सल्ला भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

भुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:53

भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.

जळगावची केळी जाणार रेल्वेने....

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 15:47

जळगाव जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी खास हॉर्टिकल्चर ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेही ही ट्रेन भुसावळवरुन निघणार असल्यानं केळी उत्पादकांना जळगांव ते भुसावळ असा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणारा आहे.

कुंपणचं शेत खातंय...

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 00:05

पेट्रोल भेसळीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात जळीतकांडंही घडली. पण पेट्रोल भेसळीसाठी जबाबदार आहे ती पेट्रोल कंपन्यांपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत पेट्रोल पोहोचवण्याची सडलेली व्यवस्था. नाशिकजवळच्या पेट्रोल कंपनीच्या डेपोमध्येच कमी पेट्रोल भरलं जात असल्याचं उघड झालं आहे.

शिर्डीत मजुराचा गुदमरून मृत्यू

Last Updated: Monday, January 23, 2012, 11:36

शिर्डी साईमंदिरा जवळ असलेल्या साई काँम्प्लेक्सच्या चेंबरमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाला.

अल्टिमेटमनंतर नाशिकमध्ये युती

Last Updated: Saturday, January 21, 2012, 07:35

नाशिक महापालिका निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेऊन शिवसेनेला तिष्ठत ठेवणा-या भाजपची भूमिका मवाळ झाली आहे. शिवसेनेनं बुधवारी भाजपला २४ तासांच्या अल्टिमेटम दिल्यानंतर भाजप पदाधिका-यांनी शिवसेनेसोबत चर्चेची तयारी दाखविली.

नाशकातही आघाडीची 'हात' मिळवणी

Last Updated: Friday, January 20, 2012, 12:03

नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय झालाय. छगन भूजबळांच्या रामटेक या निवासस्थानी पाच तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

नाशिक-मुंबई रेल्वेसेवा ठप्प

Last Updated: Thursday, January 19, 2012, 12:37

नाशिक - असवाली स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे नाशिक-मुंबई वाहतूक बंद आहे. मालगाडीचे १२ डबे घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

नाशिकमध्ये युतीत चाललंय काय?

Last Updated: Thursday, January 19, 2012, 09:35

नाशिकमध्ये युती तुटणार की काय, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. नेत्यांचे आदेश येऊनही युतीची एकही बैठक झालेली नाही. आधी आक्रमक असलेले भाजप नेते आता मवाळ झालेत तर शिवसेना मात्र भाजपला झुलवत ठेवत आहे.