नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी

Last Updated: Monday, December 12, 2011, 09:07

नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सटाणामध्ये राष्ट्रवादीची विजयी घोडदौड सुरू असून येवल्यात १४ आणि सटाणामध्ये ११ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात बऱ्याच नगरपालिका राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.

शहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता

Last Updated: Sunday, December 11, 2011, 17:59

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. काँग्रेसने २४ जागांपैकी १७ जागा जिंकत नगरपालिकेत सत्ता काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.

सावधान... नाशकात जमीन खरेदी करताय!

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 12:56

नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं जमीन विक्री करणा-यांचा सुळसुळाट झालाय. महिनाभरात जमीन व्यवहारात फसवणुकीची पन्नास प्रकरणं समोर आली आहेत.

राष्ट्रवादीचे दिलीप वाघ पुन्हा पक्षात

Last Updated: Friday, December 9, 2011, 15:05

जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीनिमित्त पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

मातोश्रीवर सेना पदाधिका-यांची झाडाझाडती

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 12:07

उद्धव ठाकरेंनी दखल घेत मातोश्रीवर बोलावून पदाधिका-यांची झाडाझाडती घेतील. आता शिवसेना नाशिकच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अंतर्गत कलहाची कार्याध्यक्ष नेते संवादाची कमतरता होती.

पोस्ट ऑफीसमध्ये अफवांची झुंबड

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 09:22

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय.

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन

Last Updated: Monday, December 5, 2011, 15:13

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनासाठी स्थानिक शेतक-यांची मोठी गर्दी झालीये. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतीत उपयोगी पडतील अशी यंत्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भारतातील शेतीच्या कक्षा रुंदावण्यासाठी शेतक-यांना नवी दृष्टी देणार आंतरराष्ट्रीय कृषिप्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं आहे.

किस्सा मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट पत्राचा

Last Updated: Friday, December 16, 2011, 12:56

बी जे मार्केटमध्ये एक रुपये चौरस फुटानं दोन हॉल्स भाड्यानं देण्यासंदर्भात एक प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं जळगाव महापालिकेला पाठवला. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून 16 नोव्हेंबरला चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह आदेशाचं एक पत्र आयुक्तांना आलं.

आबांनी केलं सेना, मनसेला लक्ष्य

Last Updated: Monday, December 5, 2011, 03:04

उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सेनेवर टीका केली आहे. परप्रांतीयांना मुंबईतून हाकलण्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेपेक्षा शिवसेनेलाच अधिक श्रेय जातं असा टोला त्यांनी लगावला.

'समुद्रातील' मुंबई 'खड्ड्यात' घातली- आबा

Last Updated: Sunday, December 4, 2011, 06:31

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली.